कोरोनाच्या सावटात क्रीडा शिक्षकांचे प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 06:00 AM2020-03-14T06:00:00+5:302020-03-14T06:00:20+5:30

कोरोनाचा कहर सर्वत्र माजला असून विदर्भातील नागपूर येथे कोरोनाचा रुग्ण आढळल्याने पूर्व विदर्भातील आरोग्य व प्रशासन यंत्रणा सतर्क झाली आहे. राज्य शासनाने सरकारी सर्व कार्यक्रम रद्द करण्याचे आदेश दिले आहे, गर्दी करणे टाळणे अशा सूचना दिल्या आहे, परंतु शालेय शिक्षण क्रीडा विभागाने मात्र शिक्षकांचे प्रशिक्षण सुरुच ठेवले आहे.

Training of sports teachers in the shadow of Corona | कोरोनाच्या सावटात क्रीडा शिक्षकांचे प्रशिक्षण

कोरोनाच्या सावटात क्रीडा शिक्षकांचे प्रशिक्षण

Next
ठळक मुद्देफिट इंडिया मुव्हमेंट अंतर्गत प्रशिक्षण : शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : कोरोना विषाणूच्या संसर्गाची जगात भीती व्यक्त होत असून गर्दी टाळण्याचे आदेश केंद्र व राज्य शासनाने दिले आहे. परंतु क्रीडा विभागाचे फिट इंडिया मुव्हमेंट अंतर्गत शिक्षकांचे एक दिवशीय प्रशिक्षण तुमसरात शुक्रवारी आयोजित केले होते. या प्रशिक्षणाला मोठ्या प्रमाणात शिक्षकांनी हजेरी लावली होती.
कोरोनाचा कहर सर्वत्र माजला असून विदर्भातील नागपूर येथे कोरोनाचा रुग्ण आढळल्याने पूर्व विदर्भातील आरोग्य व प्रशासन यंत्रणा सतर्क झाली आहे. राज्य शासनाने सरकारी सर्व कार्यक्रम रद्द करण्याचे आदेश दिले आहे, गर्दी करणे टाळणे अशा सूचना दिल्या आहे, परंतु शालेय शिक्षण क्रीडा विभागाने मात्र शिक्षकांचे प्रशिक्षण सुरुच ठेवले आहे.
शुक्रवारी तुमसर येथे आरएसजीके शाळेत फिट इंडिया मुव्हमेंट अंतर्गत मास्टर ट्रेनर्स प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत शिक्षकांचे एकदिवसीय प्रशिक्षण देण्यात आले. यात पुरुष व महिला शिक्षकांचा समावेश होता.
सदर प्रशिक्षणात प्राजेकटरची व्यवस्था केली होती. आॅनलाईन माहिती थेट केंद्र सरकारला शालेय विद्यार्थ्यांची खेळासंदर्भात पाठवायची आहे. यासंदर्भात सदर प्रशिक्षण देण्यात आले.
एका सभागृहात प्रशिक्षणाची व्यवस्था करण्यात आली होती. सध्या वातावरणात बदल झाल्याने सर्दी, खोकला व पडसे साधारणत: लोकांना आहे.
प्रशिक्षणादरम्यान शिक्षकांमध्ये कोरोनाची चर्चा प्रशिक्षणात सुरु होती. पुन्हा भंडारा जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात सदर प्रशिक्षण होत आहे. यात भंडारा, लाखनी, साकोली, लाखांदूर, मोहाडी येथे होणार असून पवनी व तुमसर येथे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे.

शिक्षण विभागाचे दुर्लक्ष
शालेय शिक्षण विभाग व क्रीडा संचालयाने प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. परंतु सद्याची परिस्थिती पाहता गर्दी टाळणे गरजेचे आहे. तालुक्यातील शेकडो शिक्षक प्रशिक्षणादरम्यान एकत्र किमान चार ते पाच तास बसत आहेत. त्यामुळे भीती व्यक्त करण्यात येत आहे. प्रशिक्षण तात्काळ बंद करण्याची गरज आहे.
शिक्षकांत चर्चा
कोरोनाचा धसका घेतला गेला आहे. शिक्षण व क्रीडा विभाग येथे धडक प्रशिक्षण कार्यक्रम राबवित आहे. परिस्थितीनुसार त्यात बदल करण्याची चर्चा प्रशिक्षणादरम्यान शिक्षकांची सुरु होती.

Web Title: Training of sports teachers in the shadow of Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.