धनेगाव कालव्याजवळ आढळला व्यापाऱ्याचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 06:00 AM2019-12-11T06:00:00+5:302019-12-11T06:00:26+5:30

अमित माणिकचंद मेश्राम (३०) रा.सिहोरा असे मृताचे नाव आहे. तो मुळचा मध्यप्रदेशातील फुलचूर येथील रहिवासी आहे. व्यवसायाच्या निमित्ताने तो सिहोरा येथील साई कॉलनीत भाड्याने खोली घेऊन राहत होता. विशेष म्हणजे अमीतचा विवाह ठरला होता. सोमवारी तो कटंगी येथे नियोजित सासरच्या मंडळींना भेटण्यासाठी गेला. त्यानंतर तेथून सिहोरा येथे परत आला.

Trader's body found near Dhanegaon Canal | धनेगाव कालव्याजवळ आढळला व्यापाऱ्याचा मृतदेह

धनेगाव कालव्याजवळ आढळला व्यापाऱ्याचा मृतदेह

Next
ठळक मुद्देखुनाचा संशय : मृत सिहोरा येथील माही साडी सेंटरचा संचालक

लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : तुमसर तालुक्यातील सिहोरा येथील माही साडी सेंटरच्या संचालकाचा मृतदेह धनेगाव शिवारातील कालव्याजवळ सोमवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास आढळून आला. सदर कापड विक्रेत्याचा खून करण्यात आल्याचा संशय व्यक्त होत असून पोलिसांनी या प्रकरणी तुर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली. या घटनेने सिहोरा परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
अमित माणिकचंद मेश्राम (३०) रा.सिहोरा असे मृताचे नाव आहे. तो मुळचा मध्यप्रदेशातील फुलचूर येथील रहिवासी आहे. व्यवसायाच्या निमित्ताने तो सिहोरा येथील साई कॉलनीत भाड्याने खोली घेऊन राहत होता. विशेष म्हणजे अमीतचा विवाह ठरला होता. सोमवारी तो कटंगी येथे नियोजित सासरच्या मंडळींना भेटण्यासाठी गेला. त्यानंतर तेथून सिहोरा येथे परत आला. ५ वाजताच्या सुमारास त्याच्या मोबाईलवर कॉल आला आणि तो धनेगाव शिवारात गेला. रात्री उशिरापर्यंत घरी परत आला नाही. त्यामुळे त्याचा मोठा भाऊ राहुल मेश्राम व त्याच्या मित्रांनी शोध घेतला असता कालव्यावजळ त्याचा मृतदेह आढळून आला.
या घटनेची माहिती सिहोरा पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. तुर्तास पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे.
मात्र घटनास्थळावरील परिस्थिती पाहता अमीतचा कुणीतरी खून केला असावा असा संशय आहे. सायंकाळच्या सुमारास अमीतच्या वाहनाजवळ तीन ते चार उभे असल्याचे बघितले होते. परंतु पार्टी असेल असे समजून त्यांनी दुर्लक्ष केले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान अमितच्या पार्थिवावर फुलचूर येथे दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. दिलखुलास आणि मनमिळावू स्वभावाच्या अमीतच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.

घटनास्थळावर आढळले चार ग्लास
अमीत मेश्राम यांचा मृतदेह आढळला त्या परिसरात मद्याचे चार रिकामे ग्लास आढळून आले. शिवाय अनोळखी इसमाचा गॉगल आणि नास्त्याचे साहित्य आढळून आले. अमितच्या मोबाईलची तोडफोड करण्यात आली होती. तसेच त्याला ५० फूट फरफटत नेल्याच्या खुणाही घटनास्थळावर दिसत आहेत.
प्रेमप्रकरणाचा संशय
अमीत मेश्रामचे गावातील एका तरुणीसोबत प्रेमप्रकरण असल्याची चर्चा आहे. या दोघांचे फोटो मोबाईलमध्ये होते. सदर फोटो त्या मुलीच्या आईलाही अमीतने दाखविले होते. परंतु गेल्या आठवड्यात सदर मुलीचे लग्न ठरले. साखरपुडा झाला होता. फोटो व्हायरल होण्याची भीती होती. त्यातून तर अमीतचा खून झाला नाही ना? असा संशय व्यक्त होत आहे.

Web Title: Trader's body found near Dhanegaon Canal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Murderखून