जिल्हाभरात आज ९१ हजार बालकांना ‘दोन थेंब जीवनाचे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:39 IST2021-02-05T08:39:58+5:302021-02-05T08:39:58+5:30

भंडारा : पोलिओमुक्तीसाठी आरोग्य विभागाच्या वतीने विशेष पल्स पोलिओ मोहीम राज्यभर राबविण्यात येते. भंडारा जिल्ह्यातही ही मोहीम राबविण्यात ...

Today, 91,000 children across the district are given 'two drops of life'. | जिल्हाभरात आज ९१ हजार बालकांना ‘दोन थेंब जीवनाचे’

जिल्हाभरात आज ९१ हजार बालकांना ‘दोन थेंब जीवनाचे’

भंडारा : पोलिओमुक्तीसाठी आरोग्य विभागाच्या वतीने विशेष पल्स पोलिओ मोहीम राज्यभर राबविण्यात येते. भंडारा जिल्ह्यातही ही मोहीम राबविण्यात येत असून रविवार, ३१ जानेवारी रोजी बालकांना ‘दोन थेंब जीवनाचे’ दिले जाणार आहेत. यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे.

पल्स पोलिओ मोहिमेच्या फेरीकरिता भंडारा जिल्ह्यात ३३ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ९९६ आणि शहरी भागात १०७ बूथ स्थापन करण्यात आले आहेत. या अंतर्गत जिल्ह्यातील ९१ हजार ८९५ बालकांना पोलिओ डोज दिले जाणार आहेत. त्यासाठी २ हजार ६०७ मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. बूथ शिवाय अतिजोखमीचे क्षेत्र असलेल्या वीटभट्टी, झोपडपट्टी, भटक्या जमाती, बांधकाम जागा व मायग्रेटरी भागात लसीकरण करण्यात येणार आहे. जिल्ह्याला १ लाख ३९ हजार डोज लसीचा साठा प्राप्त झाला असून आरोग्य यंत्रणा यासाठी सज्ज झाली आहे.

बसस्टॅड, रेल्वे, टोल नाका येथे ६३ ट्रांझीट बूथ

‘बसस्टँड, रेल्वे स्टेशन, टोल नाका येथे ६३ ट्रांझीट बूथची व्यवस्था करण्यात आली आहे. काही ठिकाणी ५० फिरते बूथची व्यवस्था आरोग्य विभागातर्फे केली आहे.

जानेवारी २०११ नंतर राज्यात एकही रुग्ण आढळून आलेला नाही. पोलिओ लसीकरणासाठी १ लाख ३९ हजार डोजेस लसीचा साठा प्राप्त झाला आहे. बुथवर येताना तोंडाला मास्क बांधणे आणि फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन आवश्यक.

जिल्ह्यात पोलिओ निर्मूलनाकरिता पल्स पोलिओ लसीकरण मोहीम ३१ जानेवारी रोजी राबविण्यात येणार आहे. पाच वर्षांखालील बालकांना पोलिओ डोज पाजावा. पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा लाभ घ्यावा.

-डाॅ. प्रशांत उइके

जिल्हा आरोग्य अधिकारी, भंडारा.

Web Title: Today, 91,000 children across the district are given 'two drops of life'.