शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

१० कोटी रुपयांचे ऊसाचे चुकारे थकीत

By admin | Updated: June 11, 2015 00:27 IST

एकीकडे धानाचे भाव पडले, महागाई वाढली, शेतातील उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ बसत नसताना..

मार्चपासून वेतन ठप्प : कारभार वैनगंगा साखर कारखान्याचा करडी (पालोरा) : एकीकडे धानाचे भाव पडले, महागाई वाढली, शेतातील उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ बसत नसताना शेतकऱ्यांना ऊसाच्या नगदी चुकाऱ्यांचा आधार वाटत होता. मात्र वैनगंगा शुगर कारखान्याने शेतकऱ्यांचे १० कोटींचे चुकारे जानेवारीपासून थकीत ठेवले आहेत. मार्च महिन्यापासून कामगारांना वेतन मिळालेले नसल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. शासनाच्या जाहीर हमी भावापेक्षा कमी दरात ऊसाची खरेदी केली जात असतांनाही शेतकऱ्यांची कुरबुर नाही. कामगारांना कमी वेतन दिले जात असतानाही त्यांच्या तक्रारी नाहीत. मात्र एवढे सहन करुनही ऊसाचे वेळेवर चुकारे मिळत नसतील, कर्मचाऱ्यांना नियमित मिळत नसेल तर न्याय मागायचा कुणाकडे? असा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. दि.३१ मार्चपर्यंत ऊसाचे चुकारे देण्याचे आश्वासान कारखाना प्रशासनाने दिले होते. मात्र मार्च, एप्रिल, मे महिना संपून जून महिना सुरु झालेला असताना चुकाऱ्याचा प्रश्न निकाली निघालेला नाही. कारखान्यातील २०० च्यावर कामगारांना मार्च २०१५ पासून वेतन मिळालेले नाही. परिणामी, कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. मात्र सांगायचे कुणाला, तक्रार करणाऱ्याला कामावर ठेवले जाईल, याची शाश्वती नसल्यामुळे कुणीही बंड पुकारायला तयार नाहीत. चुकारे आज देऊ, उद्या देऊ या पलिकडे सांगायला तयार नाहीत. त्यामुळे ऊसाचे चुकारे अडचणीत सापडले असून कामगारांच्या वेतनाचा प्रश्न वेळीच सुटण्याची शक्यता धूसर झाली आहे. (वार्ताहर)कर्मचारी कपात मोहीमऊसाची लागवड वाढावी यासाठी कारखान्याने बीटनिहाय कार्यालय व कृषी सहाय्यक नेमले होते. मात्र वेळेवर चुकारे मिळत नसल्याने ऊसाची लागवड शेतकऱ्यांनी कमी केली. त्यामुळे ऊसाचे क्षेत्र घटले. कारखान्याने ऊसाचे क्षेत्र कमी झाल्याचे कारण सांगत कृषी कर्मचारी कपातीचे धोरण अंगिकारले आहे. त्यामुळे तरुणांवर बेरोजगार होण्याचे संकट ओढवले आहे. कारखान्याने २० ते २५ कृषी सहाय्यकांना कमी केले असले तरी कारखाना प्रशासन १० ते १२ कर्मचाऱ्यांना कामावरून काढल्याचे सांगत आहे.साखरेचे उत्पादन सर्वत्र वाढल्यामुळे साखरेचे दर घसरले आहेत. साखरेची निर्यात करताना अडचणी येत आहेत. बँकांकडूनही पाहिजे त्या प्रमाणात पैसा उपलब्ध होत नसल्यामुळे ऊसाचे चुकारे व कर्मचाऱ्यांचे वेतन प्रलंबित आहेत. ही समस्या सोडविण्यासाठी लवकरच निर्णय होईल. शेतकऱ्यांचा एक रुपयाही ठेवला जाणार नाही. पुढील वर्षात दोन टप्प्यात वेतन देण्याच्या दिशेने विचार सुरु आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन सुद्धा दिले जाईल. जिथे कामे नव्हते तेथील १०-१२ कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यात आले. आवश्यक तिथे गुणवत्तेनुसार भरती केली जाईल. - दादा टिचकुलेउपाध्यक्ष, वैनगंगा शुगर अँड पावर कारखाना देव्हाडा.