बर्ड फ्लूच्या सावटात तब्बल ५०० कोंबड्यांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:39 IST2021-02-05T08:39:40+5:302021-02-05T08:39:40+5:30

मोहाडी : सर्वत्र बर्ड फ्लूचे सावट असताना चोरट्यांनी कुक्कुटपालन केंद्रातून एक-दोन नव्हे तब्बल ५०० कोंबड्या लंपास केल्या. ही घटना ...

Theft of 500 chickens due to bird flu | बर्ड फ्लूच्या सावटात तब्बल ५०० कोंबड्यांची चोरी

बर्ड फ्लूच्या सावटात तब्बल ५०० कोंबड्यांची चोरी

मोहाडी : सर्वत्र बर्ड फ्लूचे सावट असताना चोरट्यांनी कुक्कुटपालन केंद्रातून एक-दोन नव्हे तब्बल ५०० कोंबड्या लंपास केल्या. ही घटना मोहाडी तालुक्याच्या सिरसोली येथे रविवारी उघडकीस आली. याप्रकरणी आंधळगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भंडारा येथील नरेश ठाकरे यांचे सिरसोली येथे कुक्कुटपालन केंद्र आहे. सिरसोली येथील संजीव गोमाजी मुटकुरे यांनी हे कुक्कुटपालन केंद्र किरायाने घेतले होते. गत काही महिन्यांपासून तेथे विविध जातींच्या कोंबड्यांचे पालन केले जात होते. शनिवारी त्यांनी नेहमीप्रमाणे रात्री ११ वाजता कोंबड्यांची देखभाल करुन कुक्कुटपालन केंद्र कुलूपबंद केले. दुसऱ्या दिवशी सकाळी कुक्कुटपालन केंद्रात गेले असता संपूर्ण कोंबड्या चोरीस गेल्याचे लक्षात आले.

चोरट्यांनी लेअर जातीच्या २००, पॅरेट जातीच्या १२५, काॅकरेल जातीच्या ४२ आणि बाॅयलर जातीच्या ३० अशा सुमारे ५०० कोंबड्या चोरून नेल्या. एवढेच नाही तर इलेक्ट्रॉनिक वजनकाट्याचा मदरबोर्डही चोरून नेला. सुमारे ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याची तक्रार आंधळगाव पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.

Web Title: Theft of 500 chickens due to bird flu