शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

ठाणा नळयोजना निकामी

By admin | Updated: February 27, 2016 01:04 IST

बोरगाव नदीवर बांधण्यात आलेल्या खराडी व राजेदहेगाव शेतशिवारात कोल्हापुरी बंधाऱ्यातून लाखो लिटर पाण्याच्या अपव्यय होत आहे.

लोखंडी पाट्या चोरीला, बंधारे निरुपयोगीजवाहरनगर / खरबी : बोरगाव नदीवर बांधण्यात आलेल्या खराडी व राजेदहेगाव शेतशिवारात कोल्हापुरी बंधाऱ्यातून लाखो लिटर पाण्याच्या अपव्यय होत आहे. आघाडी शासनाच्या कार्यकाळात बांधण्यात आलेल्या कोल्हापुरी बंधारे अखेरच्या घटका मोजत आहे. कोल्हापुरी बंधाऱ्यांचे पुनरूज्जीवन युतीच्या काळात होईल का, असे प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.जलयुक्त शिवार अभियान ही युती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेची जलदगतीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यानी जिल्हा प्रशासनाला दिले आहे. यातून पाण्याचे नियोजन व व्यवस्थापन करण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. परंतु कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे. पाणी अडवा पाणी जिरवा या उद्देशाने गावापासून वाहणाऱ्या नदीवर बंधाऱ्याची संकल्पना मांडण्यात आली होती. आघाडीच्या कार्येकाळात सन १९९२ मध्ये खराडी येथे कोल्हापुरी बंधारा बांधण्यात आला. कंत्राटदाराच्या निकृष्ट बांधकामामुळे बंधारा खालील भागाला पोकळ झाल्यामुळे पाण्याची साठवण बंद झाली व पुर्ण पाणी वाहून जात असते या बंधाऱ्याला १६ दारे असून यांची लोखंडी पाट्या चोरीला गेला आहे. १२ वर्षापुर्वी याच बंधाऱ्याच्या दुरूस्तीवर खर्च करण्यात आला. परंतु पाणी ना अडले ना जमिनीत जिरले. ठाणा पेट्रोलपंप येथे येथून जाणारा जलवाहिनी पाण्याअभावी निष्पळ झाली आहे. राजेदहेगाव व खराडी येथे बांधलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्यांची दुरवस्था झाली आहे. लाखो रूपये खर्च करून बांधण्यात आलेले बंधारे निकामी पडलेले आहेत. जिल्हा परिषद सिंचन विभागाकडून जुन्या बंधाऱ्याच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. मात्र बांधलेले कोल्हापुरी बंधारे क्षुल्लक किमतीच्या लोखंडी प्लेट व खालील भागाला काँक्रेट अभावी दुरूस्तीची प्रतिक्षा करीत आहे. शेतकऱ्यांचे जीवन मान उंचविण्यासाठी व हरीतक्रांतीचे स्वप्न साकारण्यासाठी जुन्या कोल्हापुरी बंधाऱ्यांची दुरूस्ती करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाने मोहिम हाती घेवून शेतकऱ्यांच्या जीवनमान उंचवण्याची गरज आहे. मात्र नवीन बंधारे बांधण्यासाठी लाखो रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला जात आहे. कोल्हापुरी बंधाऱ्यांची डागडुजी केल्यास उन्हाळ्यात होणारा पाणी टंचाईवर मात करण्यास मदत होईल व अशावेळी जनावरांना पिण्यासाठी पाणी व शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध होईल व पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होईल. (वार्ताहर)