शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

तंमुसच्या अध्यक्षपदापासून महिला कोसोदूर

By admin | Updated: February 24, 2016 00:39 IST

महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्ष पदावर महिलांची वर्णी ग्रामसभेत लावण्यात आली नाही.

ग्रामसभेत निवड नाही : सिहोरा परिसरात पदापासून महिला वंचितचुल्हाड (सिहोरा) : महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्ष पदावर महिलांची वर्णी ग्रामसभेत लावण्यात आली नाही. या सभेत निवड करण्यात येत नसल्याने महिला वंचित आहेत. सिहोरा परिसरातील ४७ गावात एकाही महिलेने अध्यक्ष पद भुषविले नाही असे दिसून येत आहे.राज्यात आघाडी शासनाने गावातील तंटे गावातच सोडविण्यासाठी महिला गांधी तंटामुक्त गाव योजना सुरु केली आहे. दिवंगत आर. आर. पाटील हे ग्राम विकास मंत्री असतांना त्यांनी विकासाची दोरी गावकऱ्यांचे हाती दिली आहे. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियाने गावात स्वच्छतेची प्रेरणा दिली आहे. गावात आपुलकीची नाते, अखंडता व गावकऱ्यांचा वेळ तथा पैसा वाचविण्यासाठी २००७ वर्षात महात्मा गांधी तंटामुक्त गाव हा अभिनव उपक्रम सुरु करण्यात आलेला आहे. गावातच तंटे निकाली काढण्यात येत असल्याने गावकऱ्यांचे विभक्त संबंध पुन्हा जोडण्याचे कार्य समिती मार्फत केली जात आहे. या समितीची निवड स्वातंत्र दिनी ग्रामसभेत केली जात आहे. विविध स्तरावर कार्य करणारे व्यक्ती, सेवा निवृत्त कर्मचारी, सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे नागरिक तथा अन्य नागरिकांचा या समितीत समावेश करण्यात येत आहे. महिलांचा समावेश अनिवार्य करण्यात आले आहे. ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, बचत गटाचे सदस्य, प्रतिष्ठित महिला यांची समितीत निवड करण्यात येत आहे. ग्राम सभेत समितीची निवड करण्यात येत असतांना अध्यक्ष पदावर निवड होण्याचा मान आजवर सिहोरा परिसरात एकाही महिलेला मिळाला नाही. विविध क्षेत्रात महिलांनी उत्तुंग भरारी घेतली आहे. अधिकार व हक्कासाठी महिला भांडताना दिसत आहे. नेतृत्व करण्याची क्षमता महिलामध्ये आहे. शासकिय व निमशासकीय, राजकारण सामाजिक क्षेत्रात महिला अग्रणी भुमिका बजावत आहेत. ७ सदस्यीय ग्रामपंचायतमध्ये ४ महिला सत्ताधारी झालेल्या आहेत.गावात अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी महिला महत्वाची भुमिका बजावत आहे. बचत गटाच्या माध्यमातून महिला एक संघ निर्माण करीत असतांना महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्ष पदावर २००७ पासून महिलांची सिहोरा परिसरात निवड करण्यात आली नाही. या पदावर वर्णी लागण्याचा पहीला बहुमान एकाही महिलेला प्राप्त झाला नाही. गावात आता पोलीस पाटील पदाची धुरा महिला सांभाळत आहे. गावच सरपंच पद भुषवून गावात विकासाची लाट या महिला नेतृत्वानी आणली आहे. अन्याय व अत्याचार विरोधात कायद्याचे चौकटीत राहून महिला लढा देत आहे. गावातील उध्वस्त संसार पुर्ववत आणण्यासाठी महिला प्रयत्न करीत आहेत. पंरतु तमुसचे अध्यक्ष पद या महिला पासून कोसो दुर ठेवण्यात आले आहे. या पदावर एकाही महिलेची वर्णी लागली नसल्याने वंचित आहेत. (वार्ताहर)ग्रामसभेत तमुसच्या अध्यक्षपदी महिलेची निवड झाल्यास महिलांचे मनोबल उंचावेल, पर्यायाने महिलात जागृकता आणता येईल. - प्रेरणा तुरकर, सदस्य जि.प. बपेरा क्षेत्रग्रामसभेला सर्वाधिकार प्राप्त आहेत. या सभेत तंमुसच्या अध्यक्षपदी महिलेची निवड गावकऱ्यांनी करायला पाहिजे.- विमल कानतोडे, सदस्य पं.स. खापा क्षेत्रगाव विकासात महिलांची भुमिका महत्वपूर्ण आहे. यामुळे तमुसचे अध्यक्ष पद सर्व समंतीने महिलांना दिल्यास महिलामध्ये जागृकता आणता येईल.- नेहा पटले, अध्यक्ष महिला मंडळ चुल्हाड