शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

आयुध निर्माणीत बिबट्याची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2020 05:00 IST

जवाहरनगर ठाणा मार्गावरील प्रोपेक्स सरोवर भीमगीरी पहाडी परिसरात ३० ऑक्टोबरच्या रात्री १०.४५ वाजता खासगी सुरक्षा रक्षकांना सर्वप्रथम दर्शन झाले होते. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. सुरुवातीला काहींनी ही अफवा आहे असे सांगितले. सोशल मीडीयावरुन एक चुकीची दृष्यफित प्रसारित झाली. तो बिबट नसून वाघ असल्याचे पुढे आले. मात्र या परिसरात बिबटाचा संचार असल्याचे १ नोव्हेंबर रोजी पु्न्हा सिद्ध झाले. बिबटाने एका गाईवर हल्ला करुन जखमी केल्याचे दिसून आले.

ठळक मुद्देआठ दिवसांपासून संचार : जेरबंद करण्यासाठी वनविभागाचे प्रयत्न

  लोकमत न्यूज नेटवर्कजवाहरनगर : भंडारा आयुध निर्माणी परिसरात गत आठ दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार असून या बिबट्याचे दोनदा दर्शन झाल्याने आणि एका गाईवर हल्ला केल्याने परिसरात दहशत निर्माण झाली आहे. वनविभागाचे पथक बिबट्याला जेरबंद करण्याच्या प्रयत्नात असून ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत.जवाहरनगर ठाणा मार्गावरील प्रोपेक्स सरोवर भीमगीरी पहाडी परिसरात ३० ऑक्टोबरच्या रात्री १०.४५ वाजता खासगी सुरक्षा रक्षकांना सर्वप्रथम दर्शन झाले होते. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. सुरुवातीला काहींनी ही अफवा आहे असे सांगितले. सोशल मीडीयावरुन एक चुकीची दृष्यफित प्रसारित झाली. तो बिबट नसून वाघ असल्याचे पुढे आले. मात्र या परिसरात बिबटाचा संचार असल्याचे १ नोव्हेंबर रोजी पु्न्हा सिद्ध झाले. बिबटाने एका गाईवर हल्ला करुन जखमी केल्याचे दिसून आले. तसेच आयुध निर्माणी अग्नीशमन दलाचे कर्मचारी. सुरक्षा विभाग प्रमुख व टॉवरवर तैनात सुरक्षा रक्षकांना बिबट दिसला. त्यामुळे बिबट असल्याचे सिद्ध झाल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले. त्यामुळे हा बिबट डीएससी प्लाटून समोरील एका तळ्यालगत कर्मचाऱ्यांना दिसला. त्यानंतर तो पहाडी हीलटॉपवर वावरत असल्याचे नागरिकांनी पाहिले. काहींनी या बिबटाला आपल्या मोबाईलमध्ये चित्रीत केले. सदर बिबट धिप्पाड असून वयस्क असल्याचे सांगण्यात आले. वनविभागाचे कर्मचारी या परिसरात तळ ठोकून असून त्यांनी या परिसरात ट्रॅप कॅमेरे लावले आहेत. 

पळापळीत झाला कर्मचारी जखमी आयुध निर्माणी परिसरात बिबट शिरला. हा बिबट एका कर्मचाऱ्याला अगदी जवळून दिसला. अचानक बिबटाचे दर्शन झाल्याने त्याची पाचावर धारण बसली. त्याने पळ काढला. तेव्हा पळापळीत खाली पडून कर्मचारी जखमी झाला. उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याला सुटी देण्यात आली.

आवागमन झाले जिकरीचे आयुध निर्माणी परिसरातून पेवढा, साहुली, लोहारा येथील गावांचा रस्ता जातो. शेतकरी, कर्मचारी. व्यवसायीक रात्री अपरात्री या परिसरातून जात असतात. परंतु आता बिबट्याचा संचार असल्याने नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे. या बिबटाला वनविभागाने जेरबंद करावे अशी मागणी होत आहे.

 

टॅग्स :leopardबिबट्या