आयुध निर्माणीत बिबट्याची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2020 05:00 IST2020-11-08T05:00:00+5:302020-11-08T05:00:46+5:30

जवाहरनगर ठाणा मार्गावरील प्रोपेक्स सरोवर भीमगीरी पहाडी परिसरात ३० ऑक्टोबरच्या रात्री १०.४५ वाजता खासगी सुरक्षा रक्षकांना सर्वप्रथम दर्शन झाले होते. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. सुरुवातीला काहींनी ही अफवा आहे असे सांगितले. सोशल मीडीयावरुन एक चुकीची दृष्यफित प्रसारित झाली. तो बिबट नसून वाघ असल्याचे पुढे आले. मात्र या परिसरात बिबटाचा संचार असल्याचे १ नोव्हेंबर रोजी पु्न्हा सिद्ध झाले. बिबटाने एका गाईवर हल्ला करुन जखमी केल्याचे दिसून आले.

The terror of leopards in the manufacture of weapons | आयुध निर्माणीत बिबट्याची दहशत

आयुध निर्माणीत बिबट्याची दहशत

ठळक मुद्देआठ दिवसांपासून संचार : जेरबंद करण्यासाठी वनविभागाचे प्रयत्न

  लोकमत न्यूज नेटवर्क
जवाहरनगर : भंडारा आयुध निर्माणी परिसरात गत आठ दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार असून या बिबट्याचे दोनदा दर्शन झाल्याने आणि एका गाईवर हल्ला केल्याने परिसरात दहशत निर्माण झाली आहे. वनविभागाचे पथक बिबट्याला जेरबंद करण्याच्या प्रयत्नात असून ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत.जवाहरनगर ठाणा मार्गावरील प्रोपेक्स सरोवर भीमगीरी पहाडी परिसरात ३० ऑक्टोबरच्या रात्री १०.४५ वाजता खासगी सुरक्षा रक्षकांना सर्वप्रथम दर्शन झाले होते. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. सुरुवातीला काहींनी ही अफवा आहे असे सांगितले. सोशल मीडीयावरुन एक चुकीची दृष्यफित प्रसारित झाली. तो बिबट नसून वाघ असल्याचे पुढे आले. मात्र या परिसरात बिबटाचा संचार असल्याचे १ नोव्हेंबर रोजी पु्न्हा सिद्ध झाले. बिबटाने एका गाईवर हल्ला करुन जखमी केल्याचे दिसून आले. तसेच आयुध निर्माणी अग्नीशमन दलाचे कर्मचारी. सुरक्षा विभाग प्रमुख व टॉवरवर तैनात सुरक्षा रक्षकांना बिबट दिसला. त्यामुळे बिबट असल्याचे सिद्ध झाल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले. त्यामुळे हा बिबट डीएससी प्लाटून समोरील एका तळ्यालगत कर्मचाऱ्यांना दिसला. त्यानंतर तो पहाडी हीलटॉपवर वावरत असल्याचे नागरिकांनी पाहिले. काहींनी या बिबटाला आपल्या मोबाईलमध्ये चित्रीत केले. सदर बिबट धिप्पाड असून वयस्क असल्याचे सांगण्यात आले. वनविभागाचे कर्मचारी या परिसरात तळ ठोकून असून त्यांनी या परिसरात ट्रॅप कॅमेरे लावले आहेत. 

पळापळीत झाला कर्मचारी जखमी
 आयुध निर्माणी परिसरात बिबट शिरला. हा बिबट एका कर्मचाऱ्याला अगदी जवळून दिसला. अचानक बिबटाचे दर्शन झाल्याने त्याची पाचावर धारण बसली. त्याने पळ काढला. तेव्हा पळापळीत खाली पडून कर्मचारी जखमी झाला. उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याला सुटी देण्यात आली.

आवागमन झाले जिकरीचे
 आयुध निर्माणी परिसरातून पेवढा, साहुली, लोहारा येथील गावांचा रस्ता जातो. शेतकरी, कर्मचारी. व्यवसायीक रात्री अपरात्री या परिसरातून जात असतात. परंतु आता बिबट्याचा संचार असल्याने नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे. या बिबटाला वनविभागाने जेरबंद करावे अशी मागणी होत आहे.

 

Web Title: The terror of leopards in the manufacture of weapons