शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांनी आॅनलाईनचा धसका घेऊ नये

By admin | Updated: October 5, 2015 01:00 IST

शाळेची आॅनलाईन माहिती शाळेच्या वेळेतच भरावी याकरिता कोणतीही भीती मनात बाळगू नये.

शिक्षक परिषद : नागो गाणार यांचे प्रतिपादन तुमसर : शाळेची आॅनलाईन माहिती शाळेच्या वेळेतच भरावी याकरिता कोणतीही भीती मनात बाळगू नये. शासन कोणत्याही पक्षाचे असले तरी शेवटी शिक्षकांना प्रलंबित मागण्याकरिता संघर्ष करणे अपरिहार्य आहे, असे प्रतिपादन नागपूर विभागीय शिक्षक परिषदेचे आमदार नागो गाणार यांनी केले.ते सरस्वती विद्यालय खापा येथे आयोजित शिक्षक परिषदेच्या तालुका अधिवेशनात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष अशोक वैद्य होते. तर प्रमुख अतिथी म्हणून नागपूर विभागीय अध्यक्ष डॉ. उल्हास फडके, उपाध्यक्ष के.के. वाजपेयी, कार्यवाह अंगेश बेहलपांडे, रंगारी, बोपचे, मुख्याध्यापक सेवकराम मने उपस्थित होते.आ. गाणार पुढे म्हणाले, निवड श्रेणीच्या अनावश्यक अटी रद्द करण्यासंदर्भात शिक्षण मंत्री विनोद तावडे तयार नाही. शिक्षकांचे वैद्यकीय प्रतिपूर्ती बिल दोन लाखांपर्यंत शिक्षणाधिकाऱ्यांना निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले. वेतन महिन्याच्या पहिल्या तारखेलाच मिळणार असून शासन व टाटा कॅन्सलटन्सी यामधील आॅनलाईन करार जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत आॅनलाईन बिले स्वीकारण्याचे निर्देश वेतन पथक कार्यालयाला दिले आहे. यामुळे वेतन वेळेवरच मिळणार आहे. याप्रसंगी अन्य उपस्थित मार्गदर्शकांनी आरटीई कायदा, इयत्ता पहिली ते पाचवी, सहावी ते आठवी, व नववी ते दहाव्या वर्गाकरिता विद्यार्थी शिक्षक यांचे प्रमाण २८ आॅगस्ट २०१५ च्या शासन निर्णयाबद्दल सविस्तर माहिती दिली. प्रास्ताविक कार्यवाह रा.म. कडव, संचालन व आभार एस.सी. कुथे यांनी केले. अधिवेशनाला संयोजक पी.एम. नाकाडे, पी.बी. टेंभरे, प्रमोद संग्रामे, एस.आर. हिंगे, आर.जी. लिमजे, एस. के. गाढवे, यु.जी. कटरे, बोंदरे, वाय.आर. कापगते, व्ही.बी. लंजे, एस.बी. पटले, डी.एस. गायकवाड, आर.आर. ठाकरे, मुरली गोरवे, पी.पी. भाजीपाले, एस. एस. गौपाले, व्ही.डी. चोपकर, एम.जी. परबते यांनी सहकार्य केले. याप्रसंगी तालुक्यातील शिक्षक, शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. काही शिक्षकांनी आमदारांना येणाऱ्या अडचणींची माहिती दिली. (तालुका प्रतिनिधी )