सीबीनॅट तंत्रज्ञानाद्वारे आता टीबीची तपासणी

By Admin | Updated: September 12, 2016 00:32 IST2016-09-12T00:32:34+5:302016-09-12T00:32:34+5:30

सीबीनॅट हे एक जीन एक्सपर्ट आधारित तंत्रज्ञान किंवा मशीन असून या मशीनद्वारे थुंकीच्या नमुन्यांचे...

TB checks now with CBNET technology | सीबीनॅट तंत्रज्ञानाद्वारे आता टीबीची तपासणी

सीबीनॅट तंत्रज्ञानाद्वारे आता टीबीची तपासणी

दोन तासांत होणार निदान : नितीन वानखेडे यांची माहिती
भंडारा : सीबीनॅट हे एक जीन एक्सपर्ट आधारित तंत्रज्ञान किंवा मशीन असून या मशीनद्वारे थुंकीच्या नमुन्यांचे मायक्रो बॅक्टेरियम ट्युबरक्लोसीस आणि रिफॅम्पिसीन ड्रग्ज रेझिस्टंट यांचे निदान करते. पूर्वी ड्रग्ज रेझिस्टंट क्षय रोगाचे निदानाकरिता दोन ते चार महिने लागत असे आता हेच निदान जीन एक्सपर्ट मशीनद्वारे दोन तासात होते.
सीबीनॅट तंत्रज्ञानाद्वारे सध्या ४ प्रकारच्या टीबी संशयीत रुग्णांचे ठसे व फुफ्फूसाव्यतिरिक्त सॅम्पल (कल्चर) तपासण्यात येणार आहेत. खासगी चिकित्सक यांना कल्चर सॅम्पल घेण्याकरिता जिल्हा क्षयरोग केंद मोफत फाल्कन ट्युबचा पुरवठा करण्यात येईल. जेणेकरून सामान्य जनतेला याचा लाभ घेता येईल. जिल्हा क्षयरोग केंद्र भंडारा तसेच प्रत्येक तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात टीबी विभाग अंतर्गत मिळते. याचा लाभ वरीलपैकी टीबी संशयीत रुग्णांनी घ्यावा असे आवाहन डॉ.नितीन वानखेडे जिल्हा क्षयरोग अधिकारी यांनी केले. (शहर प्रतिनिधी)

सीबीनॅट मशिनद्वारे टीबी रोगाच्या तपासणीत आतापर्यंत ९५ कल्चर सॅम्पल लावण्यात आले. त्यामधून एक एमडीआर टीबी व दोन टीबीचे रुग्ण निदान झाले. हे तंत्रज्ञान टीबी संशयीत लहान बालके, एचआयव्ही रुग्ण, क्रॉनिक टीबी रुग्ण यांना जास्त फायदेशिर ठरणार आहे. रुग्णांचा ठसा काढण्याकरिता फाल्कन ट्युबचा वापर करण्यात येत असून त्याचा पुरवठा सर्व शासकीय आरोग्य केंद्रातून मोफत करण्यात येत आहे.
- शिवशंकर शेंडे, जिल्हा समन्वयक, जिल्हा क्षयरोग केंद्र, भंडारा

Web Title: TB checks now with CBNET technology