शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

आधी विकासाचे बोला; मतदारांचा सवाल

By admin | Updated: October 8, 2014 23:21 IST

जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत गावपुढाऱ्यांनी गावातील मूलभूत समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, या समस्या जैसे थेच आहेत. विविध प्रमुख पक्षांच्या

भंडारा : जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत गावपुढाऱ्यांनी गावातील मूलभूत समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, या समस्या जैसे थेच आहेत. विविध प्रमुख पक्षांच्या स्वबळावर लढण्याच्या निणर्यामुळे गावपुढाऱ्यांची गोची झाली आहे. प्रचाराला केवळ सहा दिवसांचा कालावधी उरला आहे. त्यामुळे रणधुमाळी चांगलीच रंगात आली आहे. प्रत्येक उमेदवार स्वत: किती चांगले आणि इतर पक्ष किती वाईट, हेच सांगत सुटले आहेत. मात्र, आरोप-प्रत्यारोपांच्या या फैरी झडत असताना गावागावांतील मूलभूत समस्या मात्र अद्यापही जैसे थेच आहेत. अलीकडे मतदारही दूधखुळे राहिलेले नाहीत. ते दारात मत मागण्यासाठी आलेल्या उमेदवाराला ‘आधी विकासाचे बोला, मतांचे नंतर बघू’ असे खडे बोल सुनावत आहेत. जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघात ५३ उमेदवार रिंगंणात आहेत. महायुती, आघाडी तुटल्यानंतर राजकीय वातावरण बदलले. स्वपक्षात उमेदवारी न मिळालेल्या इच्छुकांनी अन्य पक्षांचा झेंडा हाती घेतला. या नवख्या उमेदवारांसाठी पक्ष, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि समस्यादेखील नव्याच आहेत. या अवघड परिस्थितीत मतदारसंघातील मतदारांपर्यंत पोहोचण्याची कसरत त्यांना करावी लागत आहे. प्रत्येक मतदारसंघात एमआयडीसी आहे. मात्र, उद्योग नाहीत, रस्ते नाहीत. दर्जेदार शिक्षण, शेतमालावर आधारित उद्योग, पाणीटंचाई, भारनियमन यांसह अनेक मूलभूत समस्या जैसे थे आहेत. यंदा स्वबळावर निवडणूक लढविली जात असल्याने उमेदवारांची भाऊगर्दी आहे. हे उमेदवार मतदारांना आश्वासन देत आहेत. मात्र, मूलभूत समस्यांनी ग्रासलेले मतदार उमेदवारांना खडे बोल सुनावत आहेत. (प्रतिनिधी)