शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
6
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
7
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
8
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
9
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
10
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
11
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
12
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
13
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
14
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
15
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
16
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
17
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
18
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
19
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
20
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
Daily Top 2Weekly Top 5

सर्वेक्षण पथकाने दररोज १० गृहभेटी द्याव्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 06:00 IST

कोरोना प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर कायदा, सुव्यवस्थेसंबंधी जिल्ह्यातील पोलीस अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगरपरिषद व नगरपंचायतीचे मुख्याध्याधिकारी तसेच इतर विभाग प्रमुखांची बैठक जिल्हा परिषद सभागृहात आयोजित करण्यात आली होती.

ठळक मुद्देएम.जे. प्रदीपचंद्रन : सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा, तहसीलदार व बीडीओंनी समन्वय ठेवावा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वाेतोपरी उपाययोजना करीत आहे. ग्रामीण भागातील जलद सर्वेक्षण पथकाने प्राधान्याने दररोज दहा गृहभेटी देवून त्यांचा अहवाल गटविकास अधिकाऱ्यांना द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्र यांनी अधिकाऱ्यांना दिले.कोरोना प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर कायदा, सुव्यवस्थेसंबंधी जिल्ह्यातील पोलीस अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगरपरिषद व नगरपंचायतीचे मुख्याध्याधिकारी तसेच इतर विभाग प्रमुखांची बैठक जिल्हा परिषद सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी भुमेश्वरी एस., जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, उपविभागीय अधिकारी डॉ. कृष्णनाथ पांचाळ, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद मोटघरे आदी उपस्थित होते.कोरोना प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक गावात जलद सर्वेक्षण पथकाची अंमलबजावणी योग्यरितीने करण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक व आशा वर्कर यांच्या नावासह आदेश उपविभागीय अधिकाऱ्यांनी त्वरीत निर्गमित करावी, जलद सर्वेक्षण पथकाने दररोज दहा गृहभेटी देणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. आवश्यक कामासाठी घराबाहेर जाण्यास परवानगी देण्यासाठी भंडारा शहरात चार झोन तयार करावे, आवश्यक असल्यास परवानगी द्यावी, तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना परवानगी देण्यासाठी उपविभागीय अधिकाºयांनी नायब तहसीलदारांची नियुक्ती करावी तसेच शहरी भागात नगरपरिषद व नगरपंचायत, मुख्याधिकारी हे त्यांनी नेमून दिलेल्या कर्मचाऱ्यांना नियुक्त करतील, असे आदेश देण्यात आले.बैठकीतून संदेशजिल्हा परिषद सभागृहात आयोजित बैठकीत उपस्थित सर्व अधिकारी विशिष्ठ अंतर ठेवून बसलेले होते. सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करीत प्रत्येक अधिकाऱ्यांनी या बैठकीतून नागरिकांना एकप्रमारे संदेशच दिला. बैठकीला उपस्थित सर्व अधिकारी विशिष्ठ अंतरावर बसले होते.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसzpजिल्हा परिषद