शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
4
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
5
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
6
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
7
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
8
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
9
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
10
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
11
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
12
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
13
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
14
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
15
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
18
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
19
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
20
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
Daily Top 2Weekly Top 5

सर्वशिक्षा अभियानांतर्गत ७२९ विद्यार्थ्यांवर शस्त्रक्रिया

By admin | Updated: September 20, 2014 23:43 IST

सन २००४-०५ मध्ये प्रारंभ झालेल्या सर्वशिक्षा अभियानांतर्गत आतापर्यंतच्या आठ वर्षात जिल्ह्यातील ७२९ विद्यार्थ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत. यात अस्थिव्यंग, कर्णबधिर व दृष्टीदोष

निधी झाला बंद : यावर्षी बसणार फटकाप्रशांत देसाई - भंडारासन २००४-०५ मध्ये प्रारंभ झालेल्या सर्वशिक्षा अभियानांतर्गत आतापर्यंतच्या आठ वर्षात जिल्ह्यातील ७२९ विद्यार्थ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत. यात अस्थिव्यंग, कर्णबधिर व दृष्टीदोष या प्रवर्गातील शस्त्रक्रियांचा समावेश आहे. शासनाच्या या उपक्रमाचा विद्यार्थ्यांना चांगलाच लाभ झाला. परंतु यावर्षीपासून अशा शस्त्रक्रियेसाठी देण्यात येणारा निधी बंद करण्यात आल्यामुळे आता शस्त्रक्रिया कशा होतील, हा प्रश्न अनुत्तरीत राहणार आहे. सन २००४-२००५ मध्ये सर्वशिक्षा अभियानाची सुरूवात झाली. या अभियानाच्या माध्यमातून शाळाबाह्य व अपंग प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शोधून त्यांना शाळेत दाखल करणे. त्यांच्यात अस्थिव्यंग, कर्णबधिर व दृष्टीदोष असलेल्या विद्यार्थ्यांना शोधून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणे असा त्यामागील हेतू आहे. मागीलवर्षी सर्वशिक्षा अभियानांतर्गत ७२९ विद्यार्थ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. यावर्षी शासनाने हा निधी बंद केल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या शस्त्रक्रिया रखडलेल्या आहेत. अनेक विद्यार्थी शाळाबाह्य असल्याचा प्रकार शिक्षण विभागाला दिसून आला. यातील अनेक विद्यार्थी अपंग प्रवर्गात असल्याने पालकांचेही त्यांच्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे प्रकरण समोर आले. त्यामुळे शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाने अनेक योजना अंमलात आणल्या. त्या अनुषंगाने समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षणाचा लाभ मिळावा, यासाठी शिक्षण विभागाने अपंग प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मदतनिस व दूर अंतरावरील शाळेत त्यांना पोहोचविण्यासाठी मदतनिस देऊन त्यांना ३०० महिन्याकाठी भत्ता देण्यात येत होता. शैक्षणिक सत्राच्या १० महिन्यासाठी हा मदतनिस भत्ता देण्यात येतो. यावर्षी सन २०१४-१५ साठी सर्वशिक्षा अभियानातंर्गत २०६ विद्यार्थ्यांसाठी २०६ मदतनिसांची नियुक्ती करण्यात आली. हे मदतनिस अपंग प्रवर्गातील विद्यार्थ्यांना त्यांच्या घरून शाळेत आणतात. शाळा सुटल्यानंतर परत घरी पोहोचवितात. यासोबतच बाहेरगावी शिक्षणासाठी जाणाऱ्या अपंग विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणीसाठी मदत व्हावी, बाहेरगावी शिक्षण घेणाऱ्या ६८ विद्यार्थ्यांसाठी मदतनिस नियुक्त करण्यात आले आहे. त्यांनाही महिन्याकाठी ३०० रूपये प्रवासभत्ता देण्यात येतो. सर्वशिक्षा अभियानांतर्गत यावर्षी बुध्दीतपासणी करण्यात आली. यात २५० विद्यार्थी कमजोर असल्याचे निष्पन्न झाले.