शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

बटाटा लागवडीचा यशस्वी प्रयोग

By admin | Updated: January 11, 2015 22:46 IST

कृषी विभाग व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) साकोली यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील एकूण २३ शेतकऱ्यांनी २७ एकर क्षेत्रावर बटाटा लागवड केलेली आहे.

साकोली तालुक्यातील प्रयोग : २३ शेतकऱ्यांनी केली लागवडसाकोली : कृषी विभाग व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) साकोली यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील एकूण २३ शेतकऱ्यांनी २७ एकर क्षेत्रावर बटाटा लागवड केलेली आहे. भंडारा जिल्ह्याचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर.बि. चलवदे यांनी साकोली तालुक्यातील वडद या गावी राजेश कापगते यांनी लागवड केलेल्या बटाटा क्षेत्राची पाहणी केली.राजेश कापगते व तालुक्यातील २२ शेतकऱ्यांनी कृषि विभागामार्फत क्षेत्रीय भेटीचा कार्यक्रम आयोजित करून तुमसर तालुक्यातील बघेडा या गावी जावून बटाटा लागवडी बाबत माहिती समजून घेतली. बटाटा पिकाविषयी सर्व तांत्रिक व शास्त्रीय माहितीचा अभ्यास करून लागवड केली. राजेश कापगते यांनी कुफ्रिचिप्सोना-३ व कुफ्रि बहार या वानाची निवड करून बटाटा पिकासाठी पाणी व खत व्यवस्थापन ठिंबक सिंचन पद्धतीने केले. सध्या बटाटा पीक के वाढीच्या अवस्थेत असून जमिनीखालील बटाट्याची वाढ चांगली आहे. आज घडीला बटाटा पीक दोन महिन्याचे असून साधारणत: १५ फेब्रुवारीपर्यंत बटाटा काढनिस तयार होईल. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर.बी. चलवदे यांनी बटाटा पिकाची पाहणी करत असताना रोग व किडिंबाबत तांत्रिक मार्गदर्शन केले. सदर पिकाची पाहणी केल्यानंतर आर.बी. चलवदे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले. तसेच कृषि विप्सेनाऱ्या या वानाला चिप्स करिता मार्केट मध्ये खूप मागणी असल्यामुळे यापुढे या रानाची जास्तीत जास्त लागवड साकोली तालुक्यात झाली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. बटाटा लागवडीकरिता आवश्यक ते मार्गदर्शन व प्रशिक्षण करिता तालुका कृषि अधिकारी साकोली यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर.बि. चलबुदे, उपविभागीय कृषि अधिकारी एस.के. सांगडे, तालुका कृषि अधिकारी जी.के. चौधरी व तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापन (आत्मा) व्ही.एस. पारीते हे उपस्थित होते. बटाटा लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना पर्यवेक्षक आर.ए. खोब्रागडे व सहायक एस.सी. चव्हाण यांनी मार्गदर्शन केले आहे. (तालुका प्रतिनिधी)