शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रमौळी झोपडीतील प्रतीक्षाचे यश

By admin | Updated: June 11, 2015 00:30 IST

जिद्द, चिकाटी व मेहनत करण्याची प्रबळ इच्छा असल्यास कठीण परिस्थितीवर लिलया मात करता येते. ...

दिव्यात केला अभ्यास : शिकवणी नसतानाही ९० टक्के गुणविशाल रणदिवे अड्याळजिद्द, चिकाटी व मेहनत करण्याची प्रबळ इच्छा असल्यास कठीण परिस्थितीवर लिलया मात करता येते. याचा प्रत्यय दहावीच्या निकालात मिळाला. वीज नसलेल्या दहा बाय दहाच्या चंद्रमौळी झोपडीत राहून हलाखीच्या परिस्थितीमुळे शिकवणी वर्गाअभावी व वर्षभर टिमटिमत्या दिव्यात अभ्यास करणाऱ्या प्रतीक्षाने ९० टक्के गुण मिळवून समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे.अड्याळ विद्यालयात दहावीत शिकणारी प्रतीक्षा विलास पवनकर ही मूळची चुल्हाडची. घरची परिस्थिती बेताची असून लहानपणीचे तिचे वडील घर सोडून निघून गेले. त्यानंतर ते परतले नाही. अशा परिस्थितीत घर व तीन अपत्यांची जबाबदारी आई सुनंदाने ती लिलया पेलविली. नव्हे, त्यासाठी जीवाचे रान करून प्रतीक्षाला शिकविण्यासाठी गावोगावी फिरून भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला. आईचे परिश्रम सार्थकी लावण्याची इच्छा तिने बाळगली होती. जीवनाचा एकाकी गाडा हाकताना सुनंदाचा हालअपेष्टांनी पिच्छा सोडला नाही. एकाकी जीवन जगणाऱ्या आईने सन्मानाने जीवन जगता यावे, यासाठी गावातीलच मोकळ्या जागेवर झोपडीवजा घर (चंद्रमौळी झोपडी) बांधली. स्वत:ची जागा नसल्याने तिला तिथे विद्युतची जोडणीही घेता आलेली नाही. शिकवणी वर्गाशिवाय यशाचे शिखरसमाजातील सर्व पालक आपल्या पाल्याच्या शिक्षणासाठी रात्रंदिवस एक करतात. पाल्याच्या शिक्षणासाठी शिकवणी वर्ग लावून वर्षाकाठी हजारो रूपये खर्च करतात. सोबत अत्याधुनिक सुविधा पुरवितात. मात्र, प्रतीक्षाच्या जीवनात या सुविधा ‘प्रतीक्षा’ करणाऱ्या आहेत. घरात वीज नसताना दिव्यासमोर बसून अभ्यास करणे आणि कुठल्याही शिकवणी वर्गाविना प्रतीक्षाने मिळविलेले यश लाखमोलाचे ठरणारे आहे. वेळ व पैशाची बचतशाळेत शिक्षक जे शिकवितात त्याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष दिल्यास शिकवणी लावण्याची गरज नाही. खासगी शिकवणीवर हजारोंचा खर्च करण्यापेक्षा घरीच नियमित अभ्यास केल्यास शिकवणी वर्गासाठी जाण्याचा वेळ व पालकांच्या पैशाची बचत होईल. इंजिनिअर बनून कुटुंबाचा आधार बनण्याचा मानस प्रतीक्षाने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.