शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अनाथांच्या जीवनात जागविले उमेदीचे बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2016 00:50 IST

जीवनातील कठीण प्रसंगांना तोंड देताना आई, वडील, गुरूजन यासह आप्तस्वकियांचे पाठबळ व मार्गदर्शन लाभत असते.

समाजासमोर निर्माण केला आदर्श : पोलीस दादांच्या उपस्थितीत अभिनव उपक्रमइंद्रपाल कटकवार भंडाराजीवनातील कठीण प्रसंगांना तोंड देताना आई, वडील, गुरूजन यासह आप्तस्वकियांचे पाठबळ व मार्गदर्शन लाभत असते. परंतु हा दुर्दम्य मार्गदर्शनाचे बळ प्रत्येकाच्या पाठीशी असेल असे नाही. धरणीवर जन्माला आले असले तरी अनाथ म्हणून जीवन जगणाऱ्या अनाथांच्या जीवनात दोन क्षण सुखाचे हे लाख मोलाचे असतात. असाच क्षण काल पोलीस दादांनी या अनाथांच्या जीवनात निर्माण केला. औचित्य होते फक्त व्यक्तीगत आनंदाचे. मात्र हा आनंद निरागस व अनाथांसोबत साजरा करून समाजासमोर आदर्श निर्माण केला. भंडारा शहरातील मुस्लिम लायब्ररी चौक परिसरात ‘बापू बाल अनाथगृह’ आहे. या अनाथालयात ६० मुले आणि ४० मुली आहेत. ही सर्व बालके १५ वर्षे वयोगटाआतील आहेत. जीर्ण झालेल्या इमारतीत ही बालके वास्तव्यात आहेत. स्वत:ची कामे स्वत: करणे, दानशुरांच्या देणगीवर अनाथालयाचा प्रपंच चालतो. आईची ममता व वडिलांची क्षमता या बालकांनी कधी अनुभवली नाही. अशा स्थितीत आनंदाच एक क्षण त्यांच्या जीवनात उमेदीच बळ देणार ठरते. भंडाराचे पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण यांनी कुटुंब व परिचितांसह या अनाथालयाला भेट देत व्यक्तिगत कार्यक्रम या अनाथांसोबत साजरा केला. पोलीस कोण असतात?, त्यांचे कार्य काय?, ते कुठे बसतात?, चोराला कसे पकडतात, अशी विविधांगी प्रश्नांचा भडिमार या बालकांनी उपस्थित करून पोलीस दादांना आपलसं करून घेतल. जयवंत चव्हाण यांनीही या बालकांच्या प्रश्नांना मनमोकळपणाने उत्तरे दिली. आपणही पोलीस अधिकारी व्हावे असा आत्मविश्वास या निरागसांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. यावेळी उपस्थित सामाजिक कार्यकर्ते नितीन दुरगकर यांनीही बालकांना समाजातील चांगल्या वाईट गोष्टींबाबत मार्गदर्शन केले. क्षमता प्रत्येकात असते, त्या क्षमतेला योग्य संधी वाट पाहावी लागते. यासाठी कितीही मेहनत करावी लागली तरी हिंमत हारू नये. अविरतपणे चालत राहणे हेच जीवन आहे, असा मौलिक संदेशही दुरगकर यांनी दिला. जयवंत चव्हाण यांनी सर्व बालकांना खेळण्याचे साहित्य वाटप करून भोजनाचा आनंद लुटला. याप्रसंगी बसंती चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक वर्मा, उपनिरीक्षक चव्हाण, नितीन दुरगकर, शैलेंद्र श्रीवास्तव, आशिष गोंडाणे, मयुर बिसेन, सरफराज खान, रंजीत उजवणे, प्रदीप ढबाले, नितीन कुथे, अनिल उजवणे, रवी नशिने, मुकेश मेश्राम, अमित नायर, विलास मोहनकर, मनोज श्रीवास्तव, भांडारकर आदींची उपस्थिती होती.