शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्याचा मुलगा झाला पोलीस उपनिरीक्षक

By admin | Updated: April 29, 2015 00:36 IST

शेती कसणारे वडिल सरपंच झाले. घरी येणाऱ्या अधिकाऱ्यांचा रूबाब पाहून आई-वडिलांना मुलगा अधिकारी व्हावा, ..

लोकमत शुभवर्तमान : नितीन म्हणाला, जिद्दीने प्रयत्न केल्यास यश हमखास मिळते
युवराज गोमासे करडी (पालोरा)
शेती कसणारे वडिल सरपंच झाले. घरी येणाऱ्या अधिकाऱ्यांचा रूबाब पाहून आई-वडिलांना मुलगा अधिकारी व्हावा, असे मनोमनी वाटायचे. ही तळमळ त्यांनी मुलासमोर अनेकदा बोलून दाखविली. आणि मुलगा कामाला लागला. मेहनतीच्या भरवशावर तो राज्यसेवा परीक्षेत उतीर्ण झाला. पोलीस उपनिरीक्षक म्हणून त्याची निवड झाली असून पोलीस अकॅडमी नाशिक येथे प्रशिक्षणाला रूजू झाला आहे. नितीन भगवान आगासे (२७) रा.निलज खुर्द असे त्या यशस्वी तरूणाचे नाव आहे.
मोहाडी तालुक्यातील १,२०० लोकसंख्येचे निलज खुर्द एक छोटेसे गाव. बारमाही कृषी पंपाना पाणी असल्याने शेतीत हिरवेगार पीक दिसते. भगवान आगासे यांच्याकडे शेती असून दूध व गुळ घाणीचा व्यवसाय करतात. पती पत्नी दोघेही अल्पशिक्षित असले तरी श्ेती मात्र आधुनिक पद्धतीने कसतात. दोन मुले व एक मुलगी असून त्यांनी पाल्यांना उच्च शिक्षण दिले.
वडिल सरपंच झाल्यानंतर घरी अधिकाऱ्यांची यायचे. त्यांना पाहून आपलेही मुले प्रशासकीय अधिकारी व्हावे, ही त्यांची तळमळ मुलांपुढे बोलून दाखवायचे. आई-वडिलाची प्रेरणा घेऊन नितीनने प्रशासकीय सेवेत जाण्याचे ठरविले. नागपूर येथे सहा महिने स्पर्धा परीक्षेचा कोर्स पूर्ण केला. गावात परतल्यानंतर करडी येथे परिसरातील मुलांसाठी स्पर्धा परिक्षा वर्ग सुरू केले. तिसऱ्या प्रयत्नात त्याला यश आले. पोलीस उपनिरीक्षक म्हणून त्याची निवड झाली असून प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र पोलीस अ‍ॅकेडमी नाशिक येथे २७ एप्रिल रोजी तो रूजू झाला.
माणूस प्रयत्नाने मोठा होता. सातत्याने प्रयत्न केल्यास यश हमखास मिळते. तरूण या क्षेत्राकडे वळत नाही. मेहनतीला घाबरतात. परंतू ग्रामीण तरूणांनी न घाबरता नेटाने प्रयत्न करावे. महागडे वर्ग केले नाही तरी स्वकष्टाने सुद्धा यशस्वी होता येते.
शेतकरी व गरिबांना मुलांना शिकविण्यासाठी खुप कष्ट पडतात. ती सोसण्याचीही आई-वडिलांची तयारी असते, मात्र मुलांनी सुद्धा कष्ट उपसण्याची तयारी ठेवली पाहिजे. मिळालेल्या यशावरच आपले समाधान नसून उच्च पदासाठी पुन्हा प्रयत्न सुरूच राहतील, असा संदेश प्रशिक्षणासाठी निघालेल्या नितीनने तरूणांना दिला आहे.
मुलगा अधिकारी झाला. आमच्या कष्टाचे चीज झाले. लहान मुलालाही प्रशासकीय अधिकारी बनवायचे आहे. मुलीलाही स्पर्धा परीक्षांकडे वळविणार आहे. आम्ही शिकू शकलो नाही, मात्र मुलांना यशस्वी करण्याचा निर्धार नितीनच्या आई-वडिलांनी यावेळी व्यक्त केला.