शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
2
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
3
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
4
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
5
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
6
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
7
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
8
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
9
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
10
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
11
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
12
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
13
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
14
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
15
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
16
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
17
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
18
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
19
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
20
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ बांधकामाची उपअभियंत्यांकडून चौकशी सुरू

By admin | Updated: June 3, 2016 00:40 IST

बावनथडी प्रकल्पातील मुख्य कालव्यावरील बावनथडी धरण व आलेसूर - चिखली रस्त्यावरच्या पुलाचे बांधकाम निकृष्ट साहित्याचा वापर होत

दखल ‘लोकमत’ची : प्रकरण बावनथडी प्रकल्पातील कामाचेविलास बन्सोड  उसर्रा बावनथडी प्रकल्पातील मुख्य कालव्यावरील बावनथडी धरण व आलेसूर - चिखली रस्त्यावरच्या पुलाचे बांधकाम निकृष्ट साहित्याचा वापर होत असल्याची दैनिक ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित होताच बावनथडी प्रकल्पाचे उपअभियंत्यांनी गंभीर दखल घेऊन चौकशी सुरु केली आहे.वन्यप्राण्यांना ये जा करण्यासाठी मुख्य कालव्यावर पुल बांधकाम करण्यात येत आहे. सदर पुलाचे बांधकाम गोंदिया येथील एका कंत्राटदाराला देण्यात आले. सदर कंत्राटदार हा प्रकल्पातील काही अधिकारी, कर्मचारी यांच्या संगनमताने निकृष्ट साहित्याचा वापर करून पुलाचे बांधकाम सुरु आहे. यात कमी दर्जाच्या लोखंडाचा उपयोग करीत आहे. सिमेंट अल्प प्रमाणात घालत असून बांधकामावर पाणी टाकत नसल्याने कामाचा दर्जा पूर्णत: निकृष्ट झाला आहे, अशी तक्रार होती. विशेष म्हणजे नाल्यातील वाळूचा अवैधपणे चोरटी वाळूचा उपयोग सदर बांधकामात केला जात आहे. सदर बांधकाम बावनथडी धरणाच्या मुख्य कालव्यावर अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आलेसूर व चिखली भागात बांधकाम सुरु आहे. या जंगलात कुणीही ये जा करत नसल्याने याचाच कंत्राटदाराने फायदा घेत निकृष्ट बांधकाम करत आहे. यासाठी बावनथडी प्रकल्पातील कनिष्ठ अभियंता यांच्या संगनमताने सदर निकृष्ट काम होत असल्याची शेतकऱ्यांची ओरड आहे. वृत्त प्रकाशित होताच संबंधित विभागाला जाग आली. बावनथडी प्रकल्पातील तुमसर येथील उपअभियंता यांनी याकडे लक्ष देवून तात्काळ चौकशी सुरु होणार असे सदर प्रतिनिधीस सांगितले. चौकशीअंती काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.कंत्राटदारांचे धाबे दणाणलेलोकमतमध्ये वृत्त प्रकाशित होताच उपअभियंत्यांनी चौकशी सुरु केली असून कंत्राटदार व यात समाविष्ट कर्मचारी यांचे धाबे दणाणले आहे. प्रकरण दाबण्यासाठी सावरासावर होत असल्याची माहिती आहे. प्रकरण अंगलट येईल म्हणून बांधकाम करणारे कंत्राटदार व कर्मचारी लॉबिंग करीत असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. सध्या मुख्य कालव्यावर अन्य कंत्राटदारांची कामे सुरु आहेत. यात आउटलेट, व्ही.आर.बी., पुल व कालवे आदी कामे सुरु असून बाकी सर्व कंत्राटदारांनाही याचा फटका बसू शकतो, यात काही शंका नाही. आधीच बावनथडी प्रकल्पात अंदाजपत्रकाच्या किमतीपेक्षा कंत्राटदारांनी कमी दरानी कामे घेतल्याची माहिती आहे. अधिकाऱ्यांच्या संगनमताने कामाचा दर्जा कमकुवत झाला आहे.