पिंडकेपार येथे विद्यार्थ्यांना मिळाली हक्काची शाळा

By Admin | Updated: April 25, 2017 00:19 IST2017-04-25T00:19:21+5:302017-04-25T00:19:21+5:30

गाव म्हटले की येथील विद्यार्थ्यांना हक्काचे शिक्षण मिळावे यासाठी शाळांची निर्मिती करण्यात आली आहे.

Students at Pindekepar received the right school | पिंडकेपार येथे विद्यार्थ्यांना मिळाली हक्काची शाळा

पिंडकेपार येथे विद्यार्थ्यांना मिळाली हक्काची शाळा

जया सोनकुसरे यांचा पुढाकार : दीड वर्षांपासून झाडाखाली भरत होती शाळा
भंडारा : गाव म्हटले की येथील विद्यार्थ्यांना हक्काचे शिक्षण मिळावे यासाठी शाळांची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र भंडारा येथील ३ किमी अंतरावरील पिंडकेपार येथे शाळेची इमारत नव्हती. त्यामुळे विद्यार्थ्यांना झाडाखाली बसून विद्यार्जन घ्यावे लागत होते. ही परिस्थिती बघून जि.प. सदस्य जया सोनकुसरे यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे येथे शाळेची इमारत दुरुस्ती करण्यात आली आहे. यासोबतच हीच शाळा डिजीटल करुन विद्यार्थ्यांसाठी हक्काची शाळा दिली आहे.
पिंडकेपार हे गाव गोसे प्रकल्पबाधीत ३४ गावांपैकी एक आहे. येथील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे मिळावे यासाठी जिल्हा परिषदेची शाळा आहे. मात्र ती पुर्णपणे मोडकडीस आली असल्याने येथे बसून शिक्षण घेणे विद्यार्थ्यांचा जीवाला धोका पोहचण्याचा प्रसंग उद्भवू शकत असल्याची विदारक स्थिती होती. त्यामुळे येथील मुख्याध्यापक श्रावण हजारे यांनी विद्यार्थ्यांप्रती जिव्हाळा दाखवून गावातील समाज मंदिराची दुरुस्ती तिथे विद्यार्थ्यांना शिकवित होते. वेळप्रसंगी विद्यार्थ्यांना झाडाच्या सावलीत बसवून शिकविण्याचा प्रसंगही येथील शिक्षकांनी अनुभवला.
येथील जिर्णावस्थेतील इमारत पाडून नविन इमारत बांधकाम करण्यासाठी परवानगी द्यावी किंवा दुरुस्ती खर्च द्यावा अशी मागणी सोनकुसरे यांनी जिल्हा परिषद शिक्षण सभापतींकडे लावली होती. यात विशेष शाळा दुरुस्तीकरिता विशेष निधी देण्यात आला. या निधीतून शाळा दुरुस्ती करण्यात आली. सोबतच डिजीटल शाळाही बनवून विद्यार्थ्यांच्या हक्काची शाळा त्यांना देण्यात आली. त्या डिजीटल वर्ग खोलीचे उद्घाटन जि. प. सदस्य जया सोनकुसरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पं.स.उपसभापती ललीत बोंद्रे, पं.स.सदस्य वर्षा साकुरे, सरपंच प्रशांत रामटेके, मुख्या. श्रावण हजारे, उपसरपंच यशवंत सोनकुसरे, उप सरपंच मडावी, ग्रा.पं. सदस्य देवनाथ रामटेके, बडवाईक, आतीलकर, क्रिष्णा आतीलकर, गोवर्धन साकुरे उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)

शिक्षण विभागाला दिला गर्भित इशारा
शाळेची दयनिय अवस्था बघुन जिल्हा परिषद सदस्य जया सोनकुसरे यांनी शाळेला हक्काची इमारत मिळावी यासाठी जिल्हा परिषद सभागृहात विषय लावून धरला. शिक्षण विभागाने शाळा इमारत द्यावी अशी मागणी रेटून लावली. इमारत न दिल्यास वेळप्रसंगी विद्यार्थ्यांना शिक्षण विभागातच आणून इथेच वर्ग घेण्याचा इशारा दिला होता. यामुळे शिक्षण विभागाने पिंडकेपार येथे तातडीने एक वर्गखोली मंजूर करुन ती बांधली.

Web Title: Students at Pindekepar received the right school