शहरं
Join us  
Trending Stories
1
तुरुंगात असूनही भोंदू अशोक खरातला जॅकपॉट; सिंहस्थ रिंगरोड भूसंपादनातून ३ कोटी मिळणार
2
आजचे राशीभविष्य - १७ मे २०२६, नोकरी - व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील
3
आनंदवार्ता ! मान्सून अंदमान, निकोबारमध्ये दाखल; महाराष्ट्रात कधी एन्ट्री? 
4
हे दशक आपत्तींचे; गरिबीच्या खाईत अडकू; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इशारा 
5
मुलीसाठी पाच लाखांत पेपर विकत घेतला? सीबीआयकडून नांदेडात पालकांची चौकशी 
6
प्रा. मनीषा मांढरे सीबीआयच्या जाळ्यात; पुण्यातील तिसरी अटक
7
साक्रीत दुहेरी हत्याकांड; भोंदू बाबा गजाआड, अघोरी पूजेतून वाद झाल्याने हत्या करून मृतदेह पुरले
8
‘कारकुनी चुकी’मुळेच गोंधळ; पटेल, तटकरे पदावर कायम; अजित पवार गट आता निवडणूक आयोगाला नव्याने पत्र पाठवणार
9
टीईटी पेपरफुटी प्रकरण ‘तारीख पे तारीख’मध्ये अडकले; सर्व आरोपी आता जामिनावरही सुटले 
10
हवामान बदलामुळे भारतासह जगभरातील नद्यांतील ऑक्सिजनच्या प्रमाणात वेगाने घट
11
धर्मादाय आयुक्तांच्या हस्तक्षेपानंतर टाटा ट्रस्टची महत्त्वाची बैठक स्थगित
12
एक विधान अन् इस्रायल, यूएई गुप्त मैत्रीचा पर्दाफाश!
13
आम्ही दोघेच जगाचे महान नेते; दौरा ऐतिहासिक म्हणत ट्रम्प यांनी जिनपिंग भेटीचे ‘जी-२’ असे केले नामकरण
14
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
15
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
16
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
17
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
18
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
19
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
20
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
Daily Top 2Weekly Top 5

बससाठी रात्री उशिरापर्यंत थांबावे लागते विद्यार्थ्यांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 06:00 IST

भंडारा शहरात विविध गावातील हजारो विद्यार्थी माध्यमिक, उच्च माध्यमिक तथा महाविद्यालयीन शिक्षणासाठी येतात. त्यांना येण्यासाठी एसटी महामंडळाकडून सवलतीची पास उपलब्ध करुन दिली जाते. सकाळसत्रात येणारे विद्यार्थी दुपारपर्यंत गावी जातात. परंतु, दुपारसत्रात येणारे विद्यार्थी रात्री उशिरापर्यंत घरी पोहोचतात.

ठळक मुद्देनियोजनशून्यतेचा फटका : स्वतंत्र बससेवा सुरु करण्याची पालकांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या भंडारा शहरात विविध शाळा आणि महाविद्यालयांमध्ये ग्रामीण विद्यार्थी शिक्षणासाठी एसटी बसेसमधून येत असतात. परंतु, संध्याकाळी परत जाताना बहुतांश थांब्यावर बसेस थांबत नाहीत. त्यामुळे विद्यार्थी रात्री उशिरापर्यंत थांब्यावरच ताटकळत असतात. एसटी विभागाच्या हेकेखोरपणामुळे ग्रामीण विद्यार्थी रात्री उशिरा आपल्या गावी पोहोचतात. हा प्रकार दररोजचाच झाला असून आमचा हा छळ कधी थांबणार, असा प्रश्न संतप्त विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी उपस्थित केला आहे.
भंडारा शहरात विविध गावातील हजारो विद्यार्थी माध्यमिक, उच्च माध्यमिक तथा महाविद्यालयीन शिक्षणासाठी येतात. त्यांना येण्यासाठी एसटी महामंडळाकडून सवलतीची पास उपलब्ध करुन दिली जाते. सकाळसत्रात येणारे विद्यार्थी दुपारपर्यंत गावी जातात. परंतु, दुपारसत्रात येणारे विद्यार्थी रात्री उशिरापर्यंत घरी पोहोचतात. याचे कारण जाणून घेण्यासाठी शहरातील काही बस थांब्याची पाहणी केली असता विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळ होणारा धक्कादायक प्रकार पुढे आला.
भंडारा मुख्य बसस्थानकातून सुटणाऱ्या बसेसना जिल्हा परिषद चौक, राजीव गांधी चौक, खांबतलाव चौक, शास्त्री चौक, आयटीआय टाकळी याठिकाणी थांबा देण्यात आला आहे. या थांब्यावर संध्याकाळी विद्यार्थ्यांची तोबा गर्दी झालेली असते. बस येताच सर्व विद्यार्थी बसकडे धाव घेतात. अनेकदा बसमध्ये प्रवाशांची गर्दी असल्याने बसचालक थांब्यावर बस न थांबविता पुढे निघून जातात. तर विद्यार्थ्यांकडे पास असल्याने बस वाहक त्यांना बसमध्ये घेत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना दुसºया बसची वाट पाहावी लागते. दुसरी बस येताच पुन्हा तोच प्रकार घडतो. असे करताना अंधार होऊनही विद्यार्थ्यांना बस मिळत नाही. एसटी महामंडळाच्या नियोजनशून्यतेचा फटका हजारो विद्यार्थ्यांना दररोज सहन करावा लागत आहे. रात्र होऊनही विद्यार्थी घरी पोहोचत नसल्याने त्यांच्या पालकांच्या काळजाचा ठोका चुकत असतो. हा आमचा छळ आहे. एसटी विभागाने व लोकप्रतिनिधींनी आमच्यासाठी स्वतंत्र बसेसची व्यवस्था करावी, अशी एकच मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे.

बसेसची सोय करा, अन्यथा आंदोलन
आपल्या शाळेत येणारे विद्यार्थी वेळेवर घरी पोहोचतात काय? यावर संबंधित शाळा प्रशासन कधीच लक्ष देत नाहीत. शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांची जबाबदारी आमची नाही, अशीच भूमिका अनेक शाळांनी घेतली आहे. त्यामुळेच एसटी महामंडळाच्या या बेबंदशाहीबाबत त्यांना एकाही शाळेने जाब विचारला नाही. दरम्यान, सदर विद्यार्थ्यांसाठी पर्यायी बसेसची सोय करण्यात यावी, अशी मागणी विभाग नियंत्रकांकडे यापूर्वी अनेकदा करण्यात आली आहे. परंतु, त्यांनीही कोणतीही कारवाई केली नाही. परिणामी, समस्येत वाढ होत आहे. या विद्यार्थ्यांसाठी तात्काळ पर्याय एसटी बसेसची सोय करण्यात यावी, अन्यथा एसटी महामंडळाविरोधात आंदोलन करण्याचा इशारा नगरसेवक बंटी मिश्रा यांनी दिला आहे.