शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
2
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
3
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
4
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
5
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
6
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
7
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
8
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
9
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
10
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
11
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
12
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
13
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
14
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
15
PM मोदींच्या आवाहनाला गडकरींचाही प्रतिसाद, बसने प्रवास करत केली पालखी महामार्गाच्या कामांची पाहणी; दौरा सुरू असतानाच...
16
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
17
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
18
PCOS नाही, आता PMOS! ८ पैकी १ ‘या’ समस्येने त्रस्त; १७ कोटी महिलांच्या आरोग्यावर थेट परिणाम
19
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
20
मासिक शिवरात्रि व्रत २०२६: महादेव मनोकामना पूर्ण करतील, यश मिळेल, सुख लाभेल; ‘असे’ करा व्रत!
Daily Top 2Weekly Top 5

बीटीबी सब्जीमंडीत शासन निर्णयाचे काटेकोर पालन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 05:00 IST

बीटीबी सब्जीमंडीत व्यापारी व शेतकऱ्यामध्ये सोशलसाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. कठडे आणि दोर बाधून पाच फुटाचे अंतर तयार केले आहे. सब्जीमंडीच्या प्रवेशद्वारावरच सॅनिटायझर पंप लावण्यात आला आहे. यातून सर्व शेतकरी आणि व्यापारी जाणे बंधनकारक करण्यात आले आहे. १२ सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले असून येथे असणाºया सर्वांना प्रवेशपत्र आणि मास्क लावणे सक्तीचे करण्यात आले आहे

ठळक मुद्देबंडू बारापात्रे : सॅनीटायझरसह सोशल डिस्टन्सिंगमध्ये व्यवहार

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांसाठी वरदान ठरू पाहणाºया येथील बीटीबी सब्जीमंडीत कोरोना संकटाच्या काळात शासन निर्णयाचे काटेकोरपणे पालन केले जात असून सॅनिटायझरसह सोशल डिस्टन्सिंगमध्ये व्यवहार केले जात आहे. येथे होणाऱ्या भाजीपाल्याच्या खरेदीविक्रीतून दररोज साठ ते सत्तर लाख शेतकऱ्यांपर्यंत या काळात पोहोचत असल्याचे बीटीबी सब्जीमंडीचे अध्यक्ष बंडू बारापात्रे यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
बीटीबी सब्जीमंडीत व्यापारी व शेतकऱ्यामध्ये सोशलसाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. कठडे आणि दोर बाधून पाच फुटाचे अंतर तयार केले आहे. सब्जीमंडीच्या प्रवेशद्वारावरच सॅनिटायझर पंप लावण्यात आला आहे. यातून सर्व शेतकरी आणि व्यापारी जाणे बंधनकारक करण्यात आले आहे. १२ सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले असून येथे असणाºया सर्वांना प्रवेशपत्र आणि मास्क लावणे सक्तीचे करण्यात आले आहे. बाजार सकाळी ६ वाजतापासून सुरु होत असून ध्वनीक्षेपकावरुन सतत सुचना दिल्या जातात. यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक कृषी अधिकाºयाचे सहकार्य लाभत असल्याचे बंडू बारापात्रे यांनी सांगितले. कोरोना सारख्या गंभीर आजाराच्या परिस्थितीत शेतकरी आपला जीव धोक्यात घालून जिल्ह्यातील दहा लाख नागरिकांपर्यंत भाजीपाला पोहचवित आहे, असे असताना प्रशासनाकडून आम्हाला सहकार्याची अपेक्षा आहे. एवढे असतानाही काहीजण आमच्यावर आक्षेप घेत आहे. आम्ही चुकलो नाही पण प्रशासनाला तसे वाटत असेल तर भाजीपाला बंदचा आदेश द्यावा, यात शेतकऱ्याचेच नुकसान होणार आहे. अत्याचार होत असतील तर आम्ही रस्त्यावर उतरु अशा इशारा बारापात्रे यांनी दिला. यावेळी भाजीव्यापारी अतूल मानकर, इमरान शेख, दिपक पराते, मंगेश राऊत, महेंद्र मेंढे यांच्यासह आमगावचे शेतकरी राजेश सार्वे, डवाचे शेतकरी प्रकाश मस्के, गांगलवाडाचे रमेश सलामे, गराडाचे जगदिश निंबार्ते यांनीही आपले अनुभव सांगितले. पत्रपरिषदेला सुधीर धकाते उपस्थित होते.

टॅग्स :Socialसामाजिक