शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

रात्रीला साठा, दिवसा पुरवठा!

By admin | Updated: February 28, 2016 00:48 IST

मागील अनेक महिन्यापासून रेतीची चोरटी वाहतूक सुरू आहे. याकडे कुणाचेही लक्ष नसल्यामुळे हा प्रकार वाढत आहे.

अड्याळ येथील प्रकार : रिकाम्या जागेवर रेतीचे ढिगारे अड्याळ : मागील अनेक महिन्यापासून रेतीची चोरटी वाहतूक सुरू आहे. याकडे कुणाचेही लक्ष नसल्यामुळे हा प्रकार वाढत आहे. ही वाहतूक मध्यरात्री ते पहाटेपर्यंत होत असते. नदीतून आणलेल्या रेतीला मिळेल तिथे रिकाम्या जागेवर साठा करून ठेवणे. दिवसा ज्या ग्राहकाला रेती पाहिजे अशांना पुरवठा करणे हा प्रकार सुरू आहे. एकंदरीत रात्रीला चोरी व दिवसाला साव बनून हा व्यवसाय अड्याळमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहे. गावात रेतीची वाहतूक रात्रीलाच सुरू आहे. यात प्रशासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडत आहे. यावर येथील अधिकारी, कर्मचारी गप्प का? असा प्रश्न येथीलच सुज्ञ नागरीक करीत आहेत. परंतु यावर कारवाई करण्याचे अधिकार ज्यांना आहेत त्यांनाही या माफियांची भीती तर नसावी ना? असा प्रश्नही विचारला जात आहे. पवनी तालुक्यातील रेतीघाटांवर तस्करीचा हा गोरखधंदा सुरु असून अड्याळमध्ये चारही दिशेला ६ ते ७ कि.मी. अंतररावर रेतीघाट नाही. परंतु गावात खुल्या जागेवर ठिकठिकाणी रेतीचे ढिगारे आहेत.काही अधिकाऱ्यांच्या आशीर्वादामुळे अड्याळला रेती आणली जात आहे. यावर आळा घालण्याची मागणी अड्याळ येथील नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)