रोजगार देणारे उद्योग तातडीने सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2020 05:00 AM2020-05-06T05:00:00+5:302020-05-06T05:00:20+5:30

कोरोना प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार राजू कारेमोरे, जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीप चंद्र्रन, मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोदवड तसेच संबंधित विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते.

Start an employing industry immediately | रोजगार देणारे उद्योग तातडीने सुरू करा

रोजगार देणारे उद्योग तातडीने सुरू करा

Next
ठळक मुद्देआढावा बैठक : कोरोनाच्या समूळ उच्चाटनासाठी युद्धस्तरावर काम करा

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : नव्या अधिसूचनेनुसार टाळेबंदी शिथिल करून रोजगार देण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील लहान - मोठे उद्योग तातडीने सुरू करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.
कोरोना प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार राजू कारेमोरे, जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीप चंद्र्रन, मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोदवड तसेच संबंधित विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते.
कोरोना साथरोग नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून केंद्र शासनाने देशात लॉकडाऊन घोषीत केले तसेच सर्व प्रवासी वाहतूक व्यवस्था बंद केली. यामुळे अनेक नागरिक आहे त्याच ठिकाणी अडकून पडले तसेच आपल्या जिल्ह्यातही इतर राज्यातील कामगार, विद्यार्थी, पर्यटक अडकून पडले आहेत. त्यांना गावी जाण्यासाठी केलेल्या व्यवस्थेचा आढावा विधानसभा अध्यक्षांनी घेतला. वैद्यकीय तपासणी केल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीस बाहेर पाठवू नये, असे ते म्हणाले. जिल्हास्तराप्रमाणे उपविभागीय स्तरावर कोविड रुग्णालय उभारण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीप चंद्रन यांनी सांगितले. साकोली येथे २२ व्हेंटीलेटर व तुमसर येथे ६० व्हेंटीलेटरसह कोविड रुग्णालय उभारण्याचे प्रस्तावित असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Start an employing industry immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.