शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

महामंडळातील निवृत्त वाहकांच्या हाती येणार एसटीची घंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2022 05:00 IST

चालकांची कंत्राटी भरती करण्यात आली होती. कंत्राटी चालकांसोबतच आता वाहकांचा प्रश्न सोडविण्यासाठी निवृत्त वाहकांच्या हाती एसटीची घंटा हाती देण्यात येणार आहे. अनेक एसटी कर्मचारी न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष लावून होते. मात्र, आता न्यायालयानेही एसटी कर्मचाऱ्यांची मागणी बरोबर असली, तरी सध्या संप बंद करून, राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू होण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ऑक्टोबर महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांनी एसटी महामंडळाचे शासनामध्ये विलीनीकरणाच्या मागणीसाठी संप पुकारला होता. मात्र, सामान्य जनतेची फरफट होऊ नये, यासाठी महामंडळाने निवृत्त वाहक, कंत्राटी चालकांची भरती करून, एसटीची सेवा पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आता न्यायालयाच्या आदेशानंतर हळूहळू एसटी कर्मचारी कामावर रुजू होत असले, तरी सर्वच एसटी कर्मचारी अद्याप कामावर रुजू झालेले नाहीत. त्यामुळे चालकांची कंत्राटी भरती करण्यात आली होती. कंत्राटी चालकांसोबतच आता वाहकांचा प्रश्न सोडविण्यासाठी निवृत्त वाहकांच्या हाती एसटीची घंटा हाती देण्यात येणार आहे. अनेक एसटी कर्मचारी न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष लावून होते. मात्र, आता न्यायालयानेही एसटी कर्मचाऱ्यांची मागणी बरोबर असली, तरी सध्या संप बंद करून, राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू होण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

जिल्ह्यात १०० कंत्राटी चालक जिल्ह्यात तीन महिन्यांपूर्वी एसटीची सेवा पूर्वपदावर आणण्यासाठी एका खासगी कंपनीमार्फत शंभर कंत्राटी चालकांची नियुक्ती प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यानंतर, अनेक कंत्राटी कर्मचारी कामावर रुजू झाले. त्यानंतर, पुन्हा एसटी कर्मचाऱ्यांना कामावर येण्याचे आवाहन करण्यात आले होते. ३१ मार्च ही अखेरची मुदत देण्यात आली होती.

एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई करु नकागत काही महिन्यांपासून संपूर्ण राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा तिढा आता अखेर सुटला आहे. न्यायालयाने एसटी कर्मचाऱ्यांना १५ एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याचे निर्देश दिले होते. मात्र याचवेळी कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई होणार नाही, असेही सांगितले आहे. यासोबतच निवृत्ती वेतन, अंशदान पीएफच्या दृष्टीनेही विचार करावा, असे न्यायालयाने सूचविले आहे.

अखेर संपाचा तिढा सुटलाएसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिढा अखेर सुटला असून एसटी कर्मचाऱ्यांनी २२ एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश दिले आहे. तर दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यावर कारवाई करु नका, असे आदेशही कोर्टाने सरकारला दिले आहे. कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन द्यावे.

निवृत्त कंत्राटी वाहक घेणार सध्या भंडारा विभागात रुजू झालेल्या चालकांची संख्या जास्त असली, तरी वाहकाची संख्या कमी आहे. त्यामुळे एसटी बससंख्या वाढविण्यासाठी कंत्राटी निवृत्त वाहकांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती आहे. 

४७५ जण कामावरभंडारा विभागात भंडारा-गोंदिया, पवनी, तुमसर, साकोली, तिरोडा आगारातील १,४३७ एसटी कर्मचाऱ्यांपैकी ४७५ जण कामावर परतले आहेत. एकूण ३३ टक्के कर्मचाऱ्यांची कामावर उपस्थिती आहे. 

 

टॅग्स :ST Strikeएसटी संप