शहरं
Join us  
Trending Stories
1
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
2
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
3
डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे निधन; ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
सेन्सेक्स लवकरच ८९ हजारांवर? ‘मॉर्गन स्टॅन्ले’चा अहवाल; १५ टक्के वाढीचा अंदाज
5
Sunil Bharti Mittal: अदानी-अंबानींच्या मार्गावर सुनील मित्तल; १० वर्षांत सोडणार Airtel ची खुर्ची, कोण असेल उत्तराधिकारी?
6
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
7
नॉर्मल पेट्रोल आणि प्रीमियम पेट्रोल म्हणजे काय? दोन्हीच्या किमतीत किती फरक असतो? जाणून घ्या...
8
अग्रलेख : अजितदादा, हे पाहताय ना?
9
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
10
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
11
विशेष लेख: महाराष्ट्रातही लाखो मतदार वगळले जातील का?
12
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
13
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
14
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
15
‘प्रतिस्पर्धी नको, आपण भागीदार बनू; व्यापार युद्धात कोणीच विजयी नसतो’, शी जिनपिंग यांच्या ट्रम्प यांना कानपिचक्या
16
भारतीय रोज किती सोने खरेदी करतात? सरासरी दोन टन!
17
जावेद जाफ़रीच्या पत्नीची १७.५ कोटींची फसवणूक: वादग्रस्त महापालिका सहायक आयुक्त पाटीलसह साथीदारांविरुद्ध गुन्हा; पटेलला अटक
18
महाराष्ट्रात काटकसर सुरू! अधिकारी आठवड्यातून किमान १ दिवस फिरणार रेल्वे, बसने
19
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
20
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
Daily Top 2Weekly Top 5

साकोलीत उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 05:00 IST

साकोली तालुक्यातील ग्रामीण क्षेत्रातही रस्ते निर्मनुष्य दिसून येत होते. घराबाहेर कुणी न पडल्याने महामार्गावरही शुकशुकाट जाणवला. विशेष म्हणजे रविवार हा आठवडी बाजाराचा दिवस होता. मात्र प्रशासनाच्या बंदीमुळे बाजार भरला नाही. मात्र कुठेही एकही दुकान कोणत्याही व्यापाऱ्यांने किंवा भाजी विक्रेत्याने लावली नाही. एकंदरीत शहरात शांतीपूर्वक जनता कर्फ्यूला नागरिकांना साद दिली.

ठळक मुद्देटाळ्या व ताट्या, घंटानादने मानले आभार : राष्ट्रीय महामार्गावर शुकशुकाट

लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : सकाळपासूनच साकोली येथे जनता कर्फ्यूला उत्स्फुर्त प्रतिसाद नोंदविला. दररोज हजारोंची वर्दळ असणारे रस्ते आज जनता कर्फ्यू निमित्ताने सुनसान दिसून आले. शहरात कुठेही नागरिकांची वर्दळ दिसून आली नाही. फक्त पोलिसांचा फोजफाटा दिसून येत होता. सायंकाळी ५ वाजता नागरिकांनी टाळ्या तसेच ताट्यांचा घंटानाद करीत पोलीस आरोग्य सेवा पत्रकारांचे आभार मानले. कोरोना विषाणूचा वाढता प्रकोप
थांबविण्यासाठी एक दिवसीय जनता कर्फ्यूला नागरिकांनी भरभरुन प्रतिसाद दिला.
साकोली तालुक्यातील ग्रामीण क्षेत्रातही रस्ते निर्मनुष्य दिसून येत होते. घराबाहेर कुणी न पडल्याने महामार्गावरही शुकशुकाट जाणवला. विशेष म्हणजे रविवार हा आठवडी बाजाराचा दिवस होता. मात्र प्रशासनाच्या बंदीमुळे बाजार भरला नाही. मात्र कुठेही एकही दुकान कोणत्याही व्यापाऱ्यांने किंवा भाजी विक्रेत्याने लावली नाही. एकंदरीत शहरात शांतीपूर्वक जनता कर्फ्यूला नागरिकांना साद दिली. शहरातून उड्डाणपूलाचे बांधकाम होत असल्यामुळे महामार्गाच्या मधोमध बांधकाम साहित्य विखुरले आहे. मात्र सर्व्हीस रस्त्यासह उड्डाणपूलाच्या पिल्लर जवळून वाहतूक असते.
तालुक्यातील एकोडी, पिंडकेपार, बोदरा, किन्ही, उमरी, लवारी, बाम्पेवाडा, सानगडी, सासरा, कुंभली, जांभळी, उकारा, सेंदुरवाफा, विर्सी, चारगाव, गोंडउमरी यासह अन्य गावांमध्येही बंदला ग्रामीण नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहकार्य केल्याची प्राथमिक माहिती आहे.
उल्लेखनीय म्हणजे सायंकाळी ५ वाजता टाळ्या, ताट व मृदुंगाचा गजर करीत आरोग्य विभागासह पोलीस व अन्य विभागातील कर्मचाऱ्यांचे कौतुक करण्यात आले. एकंदरीत तालुक्यात जनता कर्फ्यू शांततापूर्ण वातावरणात पार पडला. यासाठी साकोली पोलीसांनी चोख बंदोबस्त लावला होता. ठिकठिकाणी सकाळपासूनच पोलिसांची महामार्गावर गस्त दिसून येत होती.

पवनीत शंभर टक्के प्रतिसाद
पवनी : कोरोना विषाणूंचा संसर्ग टाळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहनानुसार पवनी नगर व तालुक्यातील ग्रामीण भागात जनता कर्फ्यूला नागरिकांनी शंभर टक्के प्रतिसाद दिला. सकाळपासून सायंकाळी सहा वाजतापर्यंत लोकांनी घराबाहेर पडण्याचे टाकले. मेडीकल स्टोअर्स वगळता सर्व दुकाने कडकडीत बंद होती. एस. टी. बससेवा व खाजगी वाहने बंद असल्याने रस्त्यावर वाहने धावली नाहीत. पोलीस निरीक्षक यशवंत सोलसे व त्यांचे सहकारी अधिकारी, पोलीस कर्मचारी यांनी दिवसभर गस्त घातली. वैद्यकीय सेवा पुर्ववत सुरु होती. सायंकाळी ५ वाजता पवनीकर जनतेने टाळ्या, ताट, घंटीचा नाद करुन कर्मचाऱ्यांचा सन्मान केला.
चौक, बाजरपेठे कडकडीत बंद
लाखनी : शहरात जनता कर्फ्यूला १०० टक्के प्रतिसाद मिळाला आहे. शहरातील तहसील कार्यालय चौक, बाजार चौक, जयस्तंभ चौक, बसस्थानक परिसरात वर्दळ नव्हती. सकाळपासूनच जनता कर्फ्यूला लोकांचा प्रतिसाद होता. राष्ट्रीय  महामार्ग क्र. ६ वरील गाव असल्यामुळे मालवाहू ट्रकची वर्दळ सुरु होती. आरोग्यसेवा सुरळीतपणे सुरु होती. पोलिस विभागाने चोख बंदोबस्त ठेवला होता. सायंकाळी ५ वाजता थाळी व टाळ्या वाजवून त्यांचे कौतुक करण्यात आले.

मासळ येथे बंद
मासळ : मासळ व परिसरातील गावांमध्ये कोरोना वायरसला प्रतिबंध करण्यासाठी लोकांनी उत्स्फुर्तपणे जनता कर्फ्यूला प्रतिसाद देत, शंभर टक्के आपआपली प्रतिष्ठाने बंद ठेवली. सकाळपासूनच रस्त्यावर कोणतेही वाहन किंवा व्यक्ती फिरकला नाही. रविवार असून ही लोक शेतकरी व सामान्य जनता घरातच बंदिस्त होती. मासळ येथील गांधी चौक, शिवाजी चौक, बसस्टँड व इतर ठिकाणी शुकशुकाट दिसून येत आहे. कधी नव्हे अशा प्र्रकारची संचारबंदी जनतेही स्वत:हून जाहीर केली व पाळली. ग्रामीण भागातील नागरिकांना सुध्दा कोरोना नृत्यरसच्या प्रतिबंधात्मक उपायाबाबत यानिमित्ताने माहिती दिली.
दरम्यान अत्यावश्यक सेवा बजावणाºया डॉक्टर, नर्स, पोलीस व पत्रकार आदींच्या सन्मानार्थ लोक सायंकाळी ५ वाजता आपआपल्या घरांच्या गॅलरीमध्ये तसेच बाहेर निघाले व थाळीनाद, टाळ्या वाजवून त्यांना प्रोत्साहन दिले व त्यांचे आभार मानले. सध्या रस्त्यावर शुकशुकाट असून रस्ते निर्जन झाले आहेत. दिवसभरत अधूनमधून लाखांदूर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी गस्त घालत आहेत. दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडलेली नाही.
बेला येथे शुकशुकाट
भंडारा तालुक्यातील बेला येथे सकाळपासूनच गावात शुकशुकाट पहायला मिळाला. ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यूत सहभाग नोंदविला. ऐरवी चावडी व पानठेल्यावर दिसणारी गर्दी दिसून आली नाही. ग्रामस्थांनी घरातच राहणे पसंत केले. दुकाने बंद होती.