शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेत असलो तरी शेतकऱ्यांसाठी लढणार

By admin | Updated: October 16, 2016 00:22 IST

कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळामुळे आमच्या शेतकऱ्यांना नापिकीला सामोरे जावे लागत आहे.

नरेंद्र भोंडेकर : शिवसेनेची पवनी-भंडारा संघर्ष पदयात्रा भंडारा : कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळामुळे आमच्या शेतकऱ्यांना नापिकीला सामोरे जावे लागत आहे. आर्थिक संकटातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी धानाला ३,५०० रूपये क्विंटलप्रमाणे दर दिला पाहिजे, आताच्या पावसामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. आम्ही सत्तेत असलो तरी शेतकरी, कष्टकरी समाजाच्या संघर्षासाठी शिवसेना नेहमी लढत राहिली आहे, सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीतर सत्ताधाऱ्यांविरूद्ध यापुढेही लढा देत राहणार, असा इशारा शिवसेनेचे माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी दिला.शुक्रवारला पवनी येथून काढण्यात आलेली संघर्ष पदयात्रा शनिवारला भंडारा येथे पोहोचली. त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी मंचावर जिल्हाप्रमुख राजेंद्र पटले, जिल्हा उपप्रमुख संजय रेहपाडे, नगरसेविका आशा गायधने, विजय काटेखाये, राजू ब्राम्हणकर, सुरेश धुर्वे, मुकेश थोटे उपस्थित होते.यावेळी भोंडेकर म्हणाले, राज्यात भाजपा-शिवसेना युती सरकार सत्तेत आल्यानंतर विकासकामांना गती मिळाली असली तरी भंडारा जिल्ह्यातील समस्यांचे निराकरण झालेले नाही. लोकप्रतिनिधींच्या धोरणामुळे जिल्ह्याचा विकास खुंटत आहे. विरोधी पक्षसुद्धा शेतकऱ्यांचे प्रश्न उचलण्यासाठी समोर येत नाही, हे दुर्देव आहे.यावेळी राजेंद्र पटले म्हणाले, दोन वर्षांनंतरही राज्य सरकारने जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाबाबत ठोस निर्णय घेतला नाही. ‘भेल’सारखा महत्त्वाकांक्षी प्रकल्प थंडबस्त्यात पडून आहे. गरीब, वंचितांना न्याय देण्यासाठी लढणारा पक्ष म्हणून शिवसेनेची स्वतंत्र ओळख आहे. त्यामुळे जनतेच्या मुलभूत हक्कासाठी आम्ही लढत राहू. शेतकरी संकटात असतानाही त्यांना मदत मिळत नाही, पिकांचे पंचनामे झाले नाही. शिवसेना संकटातील शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे आणि नेहमी सोबत राहील, असेही त्यांनी सांगितले.संघर्ष पदयात्रेत महिला रूग्णालयाच्या जागेशेजारी बांधण्यात आलेले ठोक भाजी बाजार हटवून ती संपूर्ण जागा महिला व बाल रूग्णालयासाठी देण्यात यावी, जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, धानाला ३,५०० रूपये प्रतिक्विंटल प्रमाणे दर द्या, बाबा जुमदेव यांच्या जयंतीनिमित्त ३ एप्रिल रोजी स्थानिक सुटी देण्यात यावी, शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, रोवणी ते मळणीपर्यंतची शेतकामे रोहयोतून करण्यात यावी, मागेल त्याला कृषीपंप जोडणी देऊन २४ तास वीज पुरवठा करावा या मागण्यांचा समावेश होता. त्यानंतर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांना दिले. यावेळी त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी जे विषय राज्य व केंद्र शासनाच्या अखत्यारीत आहेत त्या मागण्यांचे प्रस्ताव पाठविण्याचे आश्वासन दिले. महिला व बाल रूग्णालयासाठी भाजी बाजाराच्या जागेचा विषय मुख्याधिकाऱ्यांशी बोलून मार्गी लावण्यात येईल, पवनी १०० खाटांचे उपजिल्हा रूग्णालयासाठी जिल्हा शल्य चिकीत्सकांशी चर्चा करून प्रस्ताव पाठविण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.यावेळी जितेश ईखार, प्रभाकर वैरागडे, योगेश तुरस्कर, दोमोधर जिभकाटे, नामदेव कावळे, डहारे गुरूजी, इस्तारी केवट यांच्यासह शेतकरी व शिवसैनिक उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)