जिल्ह्यात दोन दिवस कोरोना लसीकरणाची विशेष मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 05:00 IST2021-06-17T05:00:00+5:302021-06-17T05:00:26+5:30

जिल्ह्यात लसीकरण मोहीम वेगात सुरु आहे. मात्र ग्रामीण भागात नागरिकांमध्ये लसीवरुन प्रचंड गैरसमज आहे. त्यामुळेच लस घेण्यासाठी अनेकजण घाबरत आहेत. जिल्ह्याच्या विविध भागात लसीकरण कमी होत असल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागात लसीकरण केंद्रावर गर्दी असल्याने शहरातील नागरिक तेथे जाऊन लसीकरण करीत असल्याचे चित्र गत काही दिवसांपूर्वी दिसून येत होते. त्यानंतरही ग्रामीण जनता लसीकरणासाठी पुढाकार घेत नव्हते. विविध माध्यमातून त्यांच्यामध्ये जनजागृती करण्यात येत आहे.

A special two-day corona vaccination campaign in the district | जिल्ह्यात दोन दिवस कोरोना लसीकरणाची विशेष मोहीम

जिल्ह्यात दोन दिवस कोरोना लसीकरणाची विशेष मोहीम

ठळक मुद्देसंदीप कदम : २१ व २२ जून रोजी मोहिमेचे निर्देश

लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कोरोना लसीकरणात कमी प्रतिसाद असलेल्या किंवा अत्यल्प प्रतिसाद असलेल्या गावांतील ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी २१ व २२ जून रोजी विशेष लसीकरण मोहीम राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले. यासाठी शुक्रवारी ते रविवारदरम्यान विशेष जनजागृती अभियान घेण्याची सूचनाही त्यांनी केली. 
जिल्हाधिकारी कार्यालयातून दृरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून कोरोना लसीकरणाचा बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी निर्देश दिले. यावेळी उपजिल्हाधिकारी महेश पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. प्रशांत उईके, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास, डाॅ.माधुरी माथूरकर उपस्थित होते. सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. कोरोनावर लस हाच एकमेव इलाज असून, नागरिकांनी लस घ्यावी यासाठी तालुकास्तरीय अधिकारी, शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांनी गावात घरोघरी भेट देऊन लोकांना प्रोत्साहित करावे, असे जिल्हाधिकारी कदम यांनी सांगितले. यासाठी गावचे सरपंच व स्थानिक लोकप्रतिनिधींचे सहकारी घेण्याचेही त्यांनी आवाहन केले.
पुढील पाच ते सहा दिवस लसीकरणावर लक्ष केंद्रित करून कमी टक्केवारी असलेल्या गावांत लसीकरण वाढविण्यावर भर देण्यात यावा, सर्व यंत्रणांनी आरोग्य विभागाला सहकार्य करावे, अशी सूचना यावेळी देण्यात आली. 
जिल्ह्यात लसीकरण मोहीम वेगात सुरु आहे. मात्र ग्रामीण भागात नागरिकांमध्ये लसीवरुन प्रचंड गैरसमज आहे. त्यामुळेच लस घेण्यासाठी अनेकजण घाबरत आहेत. जिल्ह्याच्या विविध भागात लसीकरण कमी होत असल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागात लसीकरण केंद्रावर गर्दी असल्याने शहरातील नागरिक तेथे जाऊन लसीकरण करीत असल्याचे चित्र गत काही दिवसांपूर्वी दिसून येत होते. त्यानंतरही ग्रामीण जनता लसीकरणासाठी पुढाकार घेत नव्हते. विविध माध्यमातून त्यांच्यामध्ये जनजागृती करण्यात येत आहे. आता त्याचाच एक भाग म्हणून ४५ वर्षावरील नागरिकांसाठी दोन दिवस विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. नागरिकांनी लसीकरणासाठी पुढे यावे असे आवाहन करण्यात आले आहे.
 

जिल्ह्यात २४४ गावांत अल्प प्रतिसाद
- भंडारा जिल्ह्यात ग्रामीण भागात लसीबाबत अनेक गैरसमज असून हे गैरसमज दूर करून लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. सोमवारी १३० गावांत तर मंगळवारी ११४ गावांमध्ये ४५ वर्षांवरील नागरिकांना लस देण्यात येणार आहे. लसीकरण कमी असलेल्या गावांची संख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे. भंडारा ५३, मोहाडी २६, साकोली ४८, लाखनी २५, पवनी ३९, लाखांदूर ३४, तुमसर १९ अशा २४४ गावांमध्ये ही मोहीम राबविली जाणार आहे.
 

 

Web Title: A special two-day corona vaccination campaign in the district