शहरं
Join us  
Trending Stories
1
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
2
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
3
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
4
PAK vs BAN : गडबड घोटाळा! पाकिस्तानच्या संघात भारतीयांचा भरणा; रोहित शर्माचं नाव कॅप्टनच्या रुपात झळकलं
5
जालन्यात मनसे आक्रमक! ॲड. गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर ओतली शाई, सुपाऱ्या फेकल्या
6
IPL 2026: सूर्यकुमार खेळणार की नाही? हार्दिकच्या फिटनेसचं काय? MIचा कॅप्टन कोण? पाहा अपडेट
7
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
8
IPL 2026 : MI प्रमाणेच CSK चीही डाळ शिजणार नाही! दिग्गजाची प्लेऑफ्सबाबत मोठी भविष्यवाणी
9
कुस्तीपटू विनेश फोगाटला मोठा धक्का! तब्बल १८ महिन्यांनी करणार होती कुस्तीत पुनरागमन, पण...
10
"आरोप म्हणजे शिक्षा नव्हे!" निदा खान प्रकरणात असदुद्दीन ओवेसींची एंट्री, विरोधकांना सुनावले
11
Thalapathy Vijay: 'थलपती विजय'साठी मैदान मोकळं? 'व्हीसीके'कडून 'टीव्हीके'ला बिनशर्त पाठिंब्याची घोषणा!
12
'महाभारत' मालिकेत रूपा गांगुली यांनी नेसली होती २५० मीटर लांबीची साडी, या कंपनीनं केली होती तयार; किती होती किंमत? 
13
आपच्या पंजाबमधील मंत्र्याला ईडीकडून अटक, घरावर टाकलेल्या धाडीनंतर केली कारवाई   
14
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
15
आधी कथित गर्लफ्रेंडची हमाली, मग रात्री उशिरा डिनर पार्टी; अर्शदीप-समरीन जोडीचा नवा VIDEO व्हायरल
16
नाशिकच्या TCS प्रकरणावरून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा भाजपाचा डाव, काँग्रेसचा आरोप  
17
‘युझवेंद्र चहलला तुरुंगात पाठवले पाहिजे…’, भारताचा माजी क्रिकेटपटू संतापला, कारण  काय?  
18
शपथविधीनंतर सुवेंदू अधिकारी अभिवादन करण्यासाठी येताच योगींनी केलं असं काही, दिली खास भेट  
19
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
20
क्रिकेटपटू युवराज सिंगसोबत व्हायरल झालेल्या Video मधील अभिनेत्री नव्या नायर कोण आहे? पाहा PHOTOS
Daily Top 2Weekly Top 5

व्यथा सूर नदीची : नागरिकांची पाण्यासाठी एकच धावपळ

By admin | Updated: July 14, 2014 00:19 IST

लहान ओढे, नद्या सोबतच बंधारे कोरडेच आहे. मोहाडीची सूर नदी आटून दीड वर्ष झाली.

राजू बांते  मोहाडी
लहान ओढे, नद्या सोबतच बंधारे कोरडेच आहे. मोहाडीची सूर नदी आटून दीड वर्ष झाली. सूरनदीत पाणी नसण्याचा फायदा रेती उपसा करणाऱ्यांनी चांगला घेतला. त्यांना दीड महिन्याचा नदीचा कोरडा असलेला पात्र कोट्यावधी कमावून गेला. दुसरीकडे पिण्याच्या पाण्यासाठी नदीवर अवलंबून असलेली गावेही पावसाची वाट पाहत आहेत.
‘येरे येरे पावसा, तुला देतो पैसा, पाऊस आला मोठा...’ हे बालगीत आता सर्वांनाच आठवू लागले आहे. कोरडी झाली नदीही आपल्या वेदना मुकाटपणे सहन करीत मोठा पाऊस कधी पडतो याची प्रतीक्षा करीत आहे.
पावसाने कायमची पाठ फिरवली की काय? अशी अवस्था आहे. दररोज नजरा आकाशाकडे वळताहेत. पण, पावसाचा थांगपत्ता नाही. पावसासाठी सारेच कासावीस झाले आहेत. उन्हाळ्यासारखी सदृश्य परिस्थिती आहे. घराघरात थंडी देणारे संयंत्र सुरु आहेत. वातावरणाचा प्रभाव शाळेवरही झाला आहे. शिक्षण विभागाने शाळा सकाळपाळीच्या ठेवण्याच्या सूचना शाळा प्रमुखांना दिल्या आहेत. एकुणच ही परिस्थिती विपरीत झाली आहे. पावसासाठी शेतकरी आपापल्या पद्धतीने आराधना करीत आहे. पण वरूण राजाला दया येत नाही. दररोज सकाळचा दिवस लख्ख प्रकाशाने होतो. अशीच पाऊस न येण्याची परिस्थिती राहिली तर शेतकरी व सामान्याच्या घरात हाहा:कार निर्माण होण्याची शक्यता आहे. जुलैचा पंधरवडा उलटला आहे. महत्वाच्या पावसाची नक्षत्रे निघून गेली आहे. पावसाला मात्र जोर नाही. नाले, नद्या पाण्यासाठी आसूसलेल्या आहेत. नदीच्या पाण्याची भूख कायम आहे. भर पावसाळ्यात नदीच्या पात्रात चटके बसताहेत. नदीचा दाह तसाच आहे. आज सुर नदी सारख्या अनेक नद्या पावसाविना वेदना सहन करीत आहे. या नद्यांची तृष्णा कधी भागते हे निसर्गावर अवलंबून आहे. नद्यांची तहान पाण्याने भागली. नाही तर लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी फार मोठा संघर्ष करावा लागणार आहे. मोहाडीसाठी खोडगाव, सुरनदी येथून पाणी पुरवठा होतो. नदीच्या पात्रातच पाणी नाही तर लोकांची तहान कशी भागणार ही चिंता आतापासून सुरु झाली आहे. पाण्याची आस पूर्ण झाली तरच पुढचं सर्व काही व्यवस्थित होईल, अशी आस आहे.