कालव्यात दुचाकी पडून मुलगा ठार, वडील गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 05:00 AM2020-09-23T05:00:00+5:302020-09-23T05:00:36+5:30

मयंक विनोद इटवले (६) रा. दिघोरी असे मृताचे नाव आहे. तर विनोद मार्तंड इटवले (४५) असे गंभीर जखमीचे नाव आहे. रविवारी सायंकाळी विनोद इटवले खराशीवरुन दिघोरीकडे जात होते. झरप गावाजवळ कालव्याचा अंदाज न आल्याने दुचाकी या दोघांसह कालव्यात कोसळली. या घटनेची माहिती होताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांनाही जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आले.

Son killed, father seriously injured after falling into canal | कालव्यात दुचाकी पडून मुलगा ठार, वडील गंभीर

कालव्यात दुचाकी पडून मुलगा ठार, वडील गंभीर

Next
ठळक मुद्देझरपची घटना : बांधकाम कंपनीच्या चुकीने अपघात

लोकमत न्यूज नेटवर्क
खराशी/पालांदूर : रस्त्यालगतच्या अपूर्ण बांधकाम झालेल्या कालव्यात दुचाकी कोसळून झालेल्या अपघातात सहा वर्षीय मुलगा ठार तर वडील गंभीर जखमी झाले. घटना लाखनी तालुक्यातील झरप गावाजवळ घडली.
मयंक विनोद इटवले (६) रा. दिघोरी असे मृताचे नाव आहे. तर विनोद मार्तंड इटवले (४५) असे गंभीर जखमीचे नाव आहे. रविवारी सायंकाळी विनोद इटवले खराशीवरुन दिघोरीकडे जात होते. झरप गावाजवळ कालव्याचा अंदाज न आल्याने दुचाकी या दोघांसह कालव्यात कोसळली. या घटनेची माहिती होताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांनाही जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आले. मयंकची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला नागपूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास मयंकचा मृत्यू झाला. तर वडील विनोदवर भंडारा रुग्णालयात उपचार सुरु आहे.
गोसेखुर्द प्रकल्पांतर्गत नेरला उपसा सिंचन योजनेचे मुरमाडी तुपकर परिसरात कालव्याचे बांधकाम सुरु आहे. रचना एंटरप्राईजेस हे काम करीत आहे. कालवा बांधकामाच्या जागेवर वीज खांब आल्याने कंपनीने काम अर्धवट ठेवले आहे. त्यामुळे हा रस्ता अरुंद झाला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने येथे सूचना फलक लावला नसल्याने हा अपघात घडल्याचा आरोप आहे.

कंपनी कर्मचाऱ्यावर गुन्हा
अपघातास जबाबदार धरुन रचना एंटरप्राईजेस कंपनीचे कर्मचारी श्रीकांत गठाई रा. कामसरोवर ह.मु. मुरमाडी याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कंपनीने याठिकाणी सुचना फलक, रेडीयम पट्या व बॅरिकेट्स लावले नसल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

Web Title: Son killed, father seriously injured after falling into canal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.