शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित समस्या सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 23:35 IST

वैद्यकीय प्रतिपूर्ती प्रकरणे व इतर देयके निकाली काढणे, थकीत वेतन अदा करण्यात यावे, माहे मार्चचे कपात केलेले २५ टक्के वेतन अदा करावे, सातवा वेतन आयोग वेतन निश्चिती करावे, मूळ व दुय्यम सेवापुस्तक अद्ययावत करण्यात यावे, वरिष्ठ निवड श्रेणी प्रस्ताव जिल्हा परिषदेला सादर करण्यात यावे, शाळेचे विद्युत बिल ग्रामपंचायतने भरणे, शिक्षकांच्या रिक्त पदावर काम करत असलेल्या स्वयंसेवकांचे थकीत मानधन देण्यात यावे, वेतन तफावत प्रकरणे निकाली काढणे, आदी विविध विषयांवर साधकबाधक चर्चा करण्यात आली. 

ठळक मुद्देबीडीओंशी चर्चा : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ पवनी

लाेकमत न्यूज नेटवर्कपवनी : शिक्षकांच्या प्रलंबित समस्या तातडीने सोडविण्यात याव्यात, यासह अनेक मुद्द्यांवर गटविकास अधिकारी प्रमिला वाळुंज यांच्याशी बुधवारी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, तालुका पवनीच्या शिष्टमंडळाने चर्चा केली. यावेळी तालुकाध्यक्ष दिगांबर जिभकाटे, गटशिक्षणाधिकारी एन. टी. टिचकुले , शिक्षण विस्तार अधिकारी विजय भुरे, आदी उपस्थित होते. वैद्यकीय प्रतिपूर्ती प्रकरणे व इतर देयके निकाली काढणे, थकीत वेतन अदा करण्यात यावे, माहे मार्चचे कपात केलेले २५ टक्के वेतन अदा करावे, सातवा वेतन आयोग वेतन निश्चिती करावे, मूळ व दुय्यम सेवापुस्तक अद्ययावत करण्यात यावे, वरिष्ठ निवड श्रेणी प्रस्ताव जिल्हा परिषदेला सादर करण्यात यावे, शाळेचे विद्युत बिल ग्रामपंचायतने भरणे, शिक्षकांच्या रिक्त पदावर काम करत असलेल्या स्वयंसेवकांचे थकीत मानधन देण्यात यावे, वेतन तफावत प्रकरणे निकाली काढणे, आदी विविध विषयांवर साधकबाधक चर्चा करण्यात आली. विषयसूचीतील सर्व विषय निकाली काढण्यासाठी गटविकास अधिकारी प्रमिला वाळुंज यांनी २२ मार्चपर्यंतचा कालावधी शिक्षण विभागाला दिला आहे. प्रलंबित प्रकरणे लवकर निकाली काढण्यात येतील, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. यावेळी संजीव बावनकर, रमेश काटेखाये, रमेश लोणारे, बी. के. मेश्राम, अनिरुद्ध नखाते, रामरतन मोहुर्ले, प्रकाश आलोने, अनिल मरस्कोल्हे, राम पवार, उमेश खेडकर, विमोश चव्हाण, प्रीती कोचे व इतर संघ पदाधिकारी होते. संचालन उत्तम कुंभारगावे व सुधीर माकडे यांनी केेले. यावेळी कर्मचारी उपस्थित होते.

 

टॅग्स :Teacherशिक्षक