साहेब, तीन दिवसांपासून पोटात काहीच नाही जी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2020 05:00 AM2020-04-07T05:00:00+5:302020-04-07T05:00:48+5:30

सृजनशील व्यक्ती एखाद्या वाक्यानेही अस्वस्थ होऊन जातो. कोरोनाच्या संकटात अनेक कुटुंब दोन वेळच्या जेवणासाठी वणवण करीत आहे. भंडारा जिल्ह्यातही यापेक्षा वेगळे चित्र नाही. पालांदूर येथील संताजी महाविद्यालयाचे प्रा.रवी पाटेकर भंडारा येथील आपल्या घरी दूरचित्रवाणीवर बातम्या पाहत होते.

Sir, there is nothing in the stomach for three days! | साहेब, तीन दिवसांपासून पोटात काहीच नाही जी!

साहेब, तीन दिवसांपासून पोटात काहीच नाही जी!

Next
ठळक मुद्देमाणुसकीचा धर्म जागला : प्राध्यापकाच्या सहृदयतेने २० जणांना धान्य

मुखरू बागडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर : ‘साहेब, तीन दिवस झाले पोटात काहीच नाही जी, कुठेच काही मिळत नाही, चिल्या पिल्यांना जगवायचे कसे’ असा विटभट्टी कामगारांचा आर्त टाहो दूरचित्रवाणीच्या कार्यक्रमात ऐकला आणि एका सहहृदयी प्राध्यापकाचे मन हेलावून गेले. तात्काळ गावातील २० जणांच्या अन्न धान्याची व्यवस्था करून माणुसकीचा धर्म जागला.
सृजनशील व्यक्ती एखाद्या वाक्यानेही अस्वस्थ होऊन जातो. कोरोनाच्या संकटात अनेक कुटुंब दोन वेळच्या जेवणासाठी वणवण करीत आहे. भंडारा जिल्ह्यातही यापेक्षा वेगळे चित्र नाही. पालांदूर येथील संताजी महाविद्यालयाचे प्रा.रवी पाटेकर भंडारा येथील आपल्या घरी दूरचित्रवाणीवर बातम्या पाहत होते. त्यावेळी वीट कामगारांच्या व्यथा दाखविल्या जात होत्या. एका महिलेच्या तोंडून निघालेले ‘साहेब, तीन दिवसांपासून पोटात काहीच नाही जी’ हे वाक्य त्यांच्या मनाला लागले. रात्रभर प्रा.पाटेकर यांना झोप आली नाही. माणुसकीच्या नात्याने आपण काय करू शकतो हाच विचार त्यांच्या डोक्यात होता. अगदी सकाळीच प्राध्यापक पाटेकर जागे झाले. त्यांनी स्वत:च्या खर्चातून २० परिवारांना लागेल एवढे जीवनावश्यक साहित्य खरेदी केले. मुलांसाठी बिस्कीटाची सोय केली आणि थेट भंडारा शहरानजीकची वीटभट्टी गाठली.
तेथे असलेल्या कामगारांना साहित्याचे वितरण केले. येथील वीटभट्टीवरही दूरचित्रवाणीवर दाखविलेल्या व्यथापेक्षा वेगळ्या वेथ्या होत्या. अनेक चिमुकले उपाशी होते. घरातील आई-वडिल पाण्याचा घोट घेवून दिवस काढत होते. अशा कठीण प्रसंगात प्रा. पाटेकर त्यांच्यासाठी देवदूत ठरले. यासाठी प्रा. पाटेकर यांना संदीप मदाने, अविनाश काटगले यांनी सहकार्य केले.

Web Title: Sir, there is nothing in the stomach for three days!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.