शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

मिनी दारु कारखान्यावर धाड

By admin | Updated: April 28, 2017 00:31 IST

वरठी येथे असलेल्या एका घरी दारु बनविणाऱ्या अड्यावर धाड घातली. यात तिघांना अटक करण्यात आली.

तिघांना अटक : राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई भंडारा : वरठी येथे असलेल्या एका घरी दारु बनविणाऱ्या अड्यावर धाड घातली. यात तिघांना अटक करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये राबविण्यात आलेल्या अवैध मद्य निर्मिती व विक्री बाबत पाच दिवसीय विशेष मोहिमेच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक सुरेंद्र मनपिया यांचे मार्गदर्शनात दुय्यम निरीक्षकांनी गुप्त माहितीच्या आधारे शास्त्री वॉर्ड वरठी येथील संशयीत घरावर छापा घातला. तेथे मध्यप्रदेश राज्यात निर्मित व तेथेच विक्रीस असलेली बॉम्बे स्पेशल विस्की व त्यापासून महाराष्ट्रातील नामांकित विदेशी मद्याच्या रिकाम्या बाटल्यामध्ये बनावट विदेशी मद्य भरुन विक्रीस तयार केलेले, त्याचप्रमाणे बनावट झाकणे, बनावट बॉटल, लेबल, कॉक, १ दुचाकी व इतर साहित्य असा ४५,०४० किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या गुन्ह्यात आरोपी धीरज आनंदराव भेदे (२५) रा. गांधी वॉर्ड भंडारा, विक्रांत प्रेमदास भालाधरे (२६) शास्त्री वॉर्ड वरठी, अमरदीप प्रेमदास नंदागवळी (२६) रा. गौतम बुध्द वॉर्ड भंडारा या तीन आरोपीस महाराष्ट्र दारुबंदी कायद्याच्या विविध कलमाअंतर्गत अटक करण्यात आली आहे. या कारवाईत विभागाचे निरीक्षक एस. एच. मेहकरकर, दुय्यम निरिक्षक एम. एल. मोहीते, सहायक दुय्यम निरीक्षक अरविंद कोटांगले तसेच जवान जियालाल अंबुले, नरेंद्र कांबळे, जयघोष जनबंधु, महिला जवान सविता गिऱ्हेपुंजे यांनी सहभाग घेतला. (नगर प्रतिनिधी)