जिल्ह्यात आढळले सात कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2020 05:00 AM2020-06-03T05:00:00+5:302020-06-03T05:01:05+5:30

जिल्ह्यातून नागपूर येथे तपासणीसाठी आतापर्यंत २०३९ लोकांचे घशाचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. त्यापैकी १९६२ अहवाल निगेटिव्ह आले असून ३८ जणांचे नमूने पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत १३९ अहवाल अप्राप्त आहेत. १५ मे रोजी मुंबई येथून आलेली २४ वर्षीय व्यक्ती, १७ व १८ मे रोजी पुण्याहून आलेले चार तर सोलापूर जिल्ह्यातून दोन व्यक्ती भंडारा जिल्ह्यात आले.

Seven coronadoids found in the district | जिल्ह्यात आढळले सात कोरोनाबाधित

जिल्ह्यात आढळले सात कोरोनाबाधित

Next
ठळक मुद्देसंख्या पोहचली ३८ वर : सर्वाधिक रुग्ण साकोली तालुक्यातील

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : सोमवारी जिल्ह्यात एकही कोरोनाबाधीत रुग्ण आढळला नव्हता. दरम्यान मंगळवारी नागपूरहून आलेल्या अहवालात सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आता जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ३८ झाली आहे. यापैकी अ‍ॅक्टीव रुग्णांची संख्या २९ आहे.
जिल्ह्यातून नागपूर येथे तपासणीसाठी आतापर्यंत २०३९ लोकांचे घशाचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. त्यापैकी १९६२ अहवाल निगेटिव्ह आले असून ३८ जणांचे नमूने पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत १३९ अहवाल अप्राप्त आहेत. १५ मे रोजी मुंबई येथून आलेली २४ वर्षीय व्यक्ती, १७ व १८ मे रोजी पुण्याहून आलेले चार तर सोलापूर जिल्ह्यातून दोन व्यक्ती भंडारा जिल्ह्यात आले. या सर्वांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून हे सर्व साकोली तालुक्यात आले होते. ३० मे रोजी यांच्या घशाचा स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. दरम्यान मंगळवारी या सर्वांचे नमुने पॉझिटिव्ह आहेत.
आयसोलेशन वॉर्डात २९ व्यक्ती भरती असून आतापर्यंत ३२६ व्यक्तींना सुटी देण्यात आली आहेण साकोली, तुमसर, लाखांदूर, पवनी, लाखनी, भंडारा व मोहाडी तालुक्यातील कोवीड केअर सेंटरमध्ये ५५४ व्यक्ती भरती आहेत. आतापर्यंत ११८३ व्यक्तींना हॉस्पीटल क्वारंटाईनमधून सुटी देण्यात आली आहे.

जिल्ह्यात आले ३९ हजार ७५२ व्यक्ती
पुणे, मुंबई व इतर राज्यातून जिल्ह्यात ३९ हजार ७५२ व्यक्ती आले आहेत. यापैकी २७ हजार १६८ व्यक्तींचा २८ दिवसांचा होम क्वारंटाईन कालावधी पूर्ण झालेला आहे. तसेच १२ हजार ५८४ व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले असून बाहेर निघण्यास मनाई करण्यात आली आहे. तीव्र श्वासदाह असलेले १४८ व्यक्तींना भरती करण्यात आले असून १४७ व्यक्तींच्या घशातील नमुने नागपूर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी १४६ नमुने निगेटिव्ह आहेत.

Web Title: Seven coronadoids found in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.