शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

गणराज्य दिनापूर्वी नियोजन समिती स्थापित करा

By admin | Updated: January 9, 2016 01:04 IST

जिल्ह्याचा विकास करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची समिती असून तब्बल सहा महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतरही जिल्हा परिषद सदस्यांना या समितीत स्थान दिले गेले नाही.

सहा महिने लोटले : डहारे यांची मागणीभंडारा : जिल्ह्याचा विकास करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची समिती असून तब्बल सहा महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतरही जिल्हा परिषद सदस्यांना या समितीत स्थान दिले गेले नाही. येत्या आठ दिवसात जिल्हा नियोजन समितीत नवनियुक्त जिल्हा परिषद सदस्यांना स्थान देण्यात यावे अन्यथा या विरोधात २६ जानेवारीला जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा कृषी व पशुसंवर्धन सभापती नरेश डहारे यांनी दिला आहे. जिल्हा परिषदेमार्फत विकासात्मक योजना कशा राबवायच्या असा प्रश्न निर्माण झाला. जिल्हा परिषदेच्या सदस्यांना या समितीत सामावून घेणे गरजेचे असताना जिल्हा प्रशासनाने अद्यापपर्यंत जिल्हा परिषद सदस्यांना सामावून घेतलेले नाही. हा जिल्हा परिषद सदस्यांवर एक प्रकारचा अन्याय आहे. शासन प्रशासनाच्या लाल फितशाहीमुळे जिल्हा परिषद सदस्यांना जिल्हा नियोजन समितीत स्थान मिळाले नसल्यामुळे जिल्हा परिषद अंतर्गत करावयाच्या विकास कामांसाठी निधीची मागणी कशी करायची, असा प्रश्न सदस्यांसमोर उभा ठाकला आहे. शासन प्रशासनाच्या उपेक्षित धोरणामुळे जिल्हा परिषद अंतर्गत विकास कामे रखडले असल्याचा आरोपही डहारे यांनी केला आहे. याबाबत शासन प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन जिल्हा नियोजन समितीमध्ये जिल्हा परिषद सदस्यांना २६ जानेवारीपूर्वी समाविष्ट करण्यात यावे अन्यथा या विरोधात तीव्र जनआंदोलन करण्यात येईल. वेळप्रसंगी न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात येईल. याबाबतची संपूर्ण जबाबदारी शासन प्रशासनाची राहील, असा इशाराही नरेश डहारे यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)