शहरं
Join us  
Trending Stories
1
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
2
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
3
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
4
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
5
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
6
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
7
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
8
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
9
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
10
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
11
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
12
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
13
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
14
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
15
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
16
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
18
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
19
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
20
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
Daily Top 2Weekly Top 5

शिष्यवृत्ती मार्गदर्शन कार्यशाळा

By admin | Updated: July 17, 2014 23:56 IST

लोकमत बालविकास मंच, युवा नेक्स्ट, सखीमंच व रेवाबेन मनोहरभाई पटेल महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने २० जुलै रोजी दुपारी १२ वाजतापासून येथील आर.एम. पटेल महाविद्यालयात शिष्यवृत्ती

भंडारा : लोकमत बालविकास मंच, युवा नेक्स्ट, सखीमंच व रेवाबेन मनोहरभाई पटेल महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने २० जुलै रोजी दुपारी १२ वाजतापासून येथील आर.एम. पटेल महाविद्यालयात शिष्यवृत्ती मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. मंच सदस्य असणाऱ्या सदस्यांना नि:शुल्क प्रवेश देण्यात येईल.केजी टू पीजी स्कॉलरशिप कार्यक्रमाअंतर्गत एकूण २०० विविध खाजगी, सरकारी स्कॉलरशिपबद्दल मार्गदर्शन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील स्टेट, सीबीएससी पॅटर्न शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्थाचे विद्यार्थी, युवक, युवती, महिला सखी व पालक कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात.शासकीय, निमशासकीय, खासगी विविध संस्था, ट्रस्ट व कंपनी व विदेशातील सर्वच शिष्यवृत्तीचे मार्गदर्शन या कार्यशाळेद्वारे देण्यात येईल.आज शिष्यवृत्तीच्या माहितीअभावी विद्यार्थी लाखो रुपयांच्या फायद्यापासून वंचित राहतो. गरजू व गुणवंत विद्यार्थी आपल्या परिस्थितीमुळे उच्च शिक्षण घेऊ शकत नाही. म्हणून या सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती योजना त्यांच्यापर्यंत पोहचविणे आवश्यक आहे. केजी पासून पुढे पदवीपर्यंतचे व विदेशात शिक्षण घेण्यापर्यंतचे संपूर्ण शिक्षण नि:शुल्क होऊ शकते अशा सर्व योजनांची माहिती मार्गदर्शनात देण्यात येईल. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्तीमध्ये किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना १० वी, १२ वी, इंजिनिअरिंग, मेडीसीन इत्यादीकरीता महिन्याला ५ ते ८ हजार निधी दिला जातो तसेच विविध खासगी कंपनीकडून पदवीनंतरच्या विदेशात शिक्षणाकरीता १ लाख ते ८ लाख रुपये मिळतात. अशा २०० पेक्षा अधिक योजनांची माहिती महागड्या शिक्षणाला पर्याय होऊ शकतो. कार्यशाळेत विषयाचे तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. सदस्यांना नि:शुल्क तर इतरांना २० रुपये शुल्क आकारण्यात येईल. प्रथम ३०० येणाऱ्यास प्रवेश देण्यात येईल. माहितीकरीता युवा नेक्स्ट संयोजिका ग्रिष्मा खोत (८९२८९६९३८२), सखीमंच संयोजिका सीमा नंदनवार (८०८७१६२३५२) व कार्यक्रम संयोजक (९०९६०१७६७७) यांच्याशीे संपर्क साधता येईल. (मंच प्रतिनिधी)