शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

शिष्यवृत्ती मार्गदर्शन कार्यशाळा

By admin | Updated: July 19, 2014 23:47 IST

लोकमत बालविकास मंच, युवा नेक्स्ट, सखीमंच व रेवाबेन मनोहरभाई पटेल महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने २० जुलै रोजी दुपारी १२ वाजतापासून येथील आर.एम. पटेल महाविद्यालयात शिष्यवृत्ती

मिळणार योजनेची माहिती : ‘केजी टू पीजी’ स्कॉलरशिप प्रोग्रामभंडारा : लोकमत बालविकास मंच, युवा नेक्स्ट, सखीमंच व रेवाबेन मनोहरभाई पटेल महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने २० जुलै रोजी दुपारी १२ वाजतापासून येथील आर.एम. पटेल महाविद्यालयात शिष्यवृत्ती मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. मंच सदस्य असणाऱ्या सदस्यांना नि:शुल्क प्रवेश देण्यात येईल.केजी टू पीजी स्कॉलरशिप कार्यक्रमाअंतर्गत एकूण २०० विविध खाजगी, सरकारी स्कॉलरशिपबद्दल मार्गदर्शन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील स्टेट, सीबीएससी पॅटर्न शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्थाचे विद्यार्थी, युवक, युवती, महिला सखी व पालक कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात.शासकीय, निमशासकीय, खासगी विविध संस्था, ट्रस्ट व कंपनी व विदेशातील सर्वच शिष्यवृत्तीचे मार्गदर्शन या कार्यशाळेद्वारे देण्यात येईल. आज शिष्यवृत्तीच्या माहितीअभावी विद्यार्थी लाखो रुपयांच्या फायद्यापासून वंचित राहतो. गरजू व गुणवंत विद्यार्थी आपल्या परिस्थितीमुळे उच्च शिक्षण घेऊ शकत नाही. म्हणून या सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती योजना त्यांच्यापर्यंत पोहचविणे आवश्यक आहे. केजी पासून पुढे पदवीपर्यंतचे व विदेशात शिक्षण घेण्यापर्यंतचे संपूर्ण शिक्षण नि:शुल्क होऊ शकते अशा सर्व योजनांची माहिती मार्गदर्शनात देण्यात येईल. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्तीमध्ये किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना १० वी, १२ वी, इंजिनिअरिंग, मेडीसीन इत्यादीकरीता महिन्याला ५ ते ८ हजार निधी दिला जातो तसेच विविध खासगी कंपनीकडून पदवीनंतरच्या विदेशात शिक्षणाकरीता १ लाख ते ८ लाख रुपये मिळतात. अशा २०० पेक्षा अधिक योजनांची माहिती महागड्या शिक्षणाला पर्याय होऊ शकतो. कार्यशाळेत विषयाचे तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. सदस्यांना नि:शुल्क तर इतरांना २० रुपये शुल्क आकारण्यात येईल. प्रथम ३०० येणाऱ्यास प्रवेश देण्यात येईल. माहितीकरीता युवा नेक्स्ट संयोजिका ग्रिष्मा खोत (८९२८९६९३८२), सखीमंच संयोजिका सीमा नंदनवार (८०८७१६२३५२) व कार्यक्रम संयोजक (९०९६०१७६७७) यांच्याशीे संपर्क साधता येईल. (मंच प्रतिनिधी)