खापा चौकात पकडले रेतीचे ट्रक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 06:00 AM2019-09-26T06:00:00+5:302019-09-26T06:00:50+5:30

जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात सुरु असलेल्या अवैध व्यवसांवर करडी नजर ठेवली जात आहे. त्याअंतर्गत विविध ठिकाणी धाडसत्र घालण्याची मोहीम सुरु आहे. २४ सप्टेंबरला स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तुमसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना विना परवाना रेतीची वाहतूक करणारे पाच ट्रक आढळून आले.

Sand truck caught in Khapa Square | खापा चौकात पकडले रेतीचे ट्रक

खापा चौकात पकडले रेतीचे ट्रक

Next
ठळक मुद्देस्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : ७५ लाखांचा मुद्देमाल

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : मंगळवारी तहसीलदारांनी रेती तस्करांवर कारवाई करीत पाच ट्रक जप्त केले होते. अवघ्या २६ तासाच्या आतच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तुमसरजवळील खापा चौकात कारवाई करून पुन्हा पाच ट्रक पकडले. या घटनेने तालुक्यात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी सुरु असल्याचे समोर आले आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात सुरु असलेल्या अवैध व्यवसांवर करडी नजर ठेवली जात आहे. त्याअंतर्गत विविध ठिकाणी धाडसत्र घालण्याची मोहीम सुरु आहे. २४ सप्टेंबरला स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तुमसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना विना परवाना रेतीची वाहतूक करणारे पाच ट्रक आढळून आले. तपासणीदरम्यान पोलीस निरीक्षक रवींद्र मानकर यांनी तात्काळ पाचही ट्रकचालकांवर कारवाई केली. यात खापा चौकात पकडण्यात आलेल्या वाहनचालकांकडून रेती वाहतुकीचा परवाना आढळून आला नाही. यावेळी पोलिसांनी ट्रक क्रमांक एमएच २७ बीएक्स ४९९९, एमएच २७ डीएक्स ४१२१, एमएच ४० बीजी ९८२५, एमएच ३० बीडी २८८२ व एमएच ३० बीडी ४५१२ जप्त केले. या ट्रकमध्ये अंदाजे प्रत्येकी आठ ब्रास रेती भरल्याचे निदर्शनास आले. ट्रकची किंमत ७५ लक्ष रुपये असून पुढील कारवाई सुरु आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मानकर, पोलीस उपनिरीक्षक सुनील उईके,पोलीस नायक प्रदीप डहारे, विजय तायडे, निरंजन कडव आदींनी केली.
 

Web Title: Sand truck caught in Khapa Square

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :sandवाळू