शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
3
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
4
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
5
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
6
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
7
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
8
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
9
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
10
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
11
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
12
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
13
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
14
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
15
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
16
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
17
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
18
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
19
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
20
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षारोपणासाठी महिलांनी दिला ‘समता’ संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2016 00:35 IST

डोक्यावर पदर व मान खाली घालून घरातल्या घरात काम करून चूल आणि मुल सांभाळण्याची जबाबदारी ज्या महिलांवर ....

वृक्ष लागवडीतून पर्यावरण जतन : दुर्लक्षित बालोद्यानाचा होणार कायापालटभंडारा : डोक्यावर पदर व मान खाली घालून घरातल्या घरात काम करून चूल आणि मुल सांभाळण्याची जबाबदारी ज्या महिलांवर पुरूष प्रधान संस्कृतीने लादली होती. ती मोडीत काढीत महिलांनी त्यांच्या कर्तत्वाने परिस्थितीत बदल घडवून आणला आहे. महिलांनी घेतलेल्या पुढाकाराने व त्यांच्या कार्यकतृत्वाने महिलांनी पर्यावरण जतनासाठी घेतलेला पुढाकार समाजासमोर खरोखरचं आदर्शवत आहे.भंडारा शहरातील समता नगर वसाहतीत राहणाऱ्या महिलांनी पर्यावरणासाठी पुढाकार घेतलेला आहे. या वसाहतीत ले-आऊट मालकाने नागरिकांसाठी मोकड्या जागेवर बालोद्यान व मंदिरची उभारणी केली. सुरूवातीचे काही दिवस बालोद्यानात जाणाऱ्यांची संख्या मोठी होती. मात्र, कालांतराने हे बालोद्याने दुर्लक्षीत झाल्याने, त्या झाडे-झुडपे वाढली. त्यामुळे बालोद्यानाचा कायापालट करण्यासाठी नागरिकांच्या पुढाकाराची गरज असताना त्यासाठी कोणीही वज्रमुठ बांधली नाही. पर्यावरणाचा होत चाललेला ऱ्हास यावर उपाय म्हणून राज्य शासनाने वृक्ष लागवड व त्याचे संवर्धन करण्यासाठी राज्यभरात दोन कोटी वृक्ष लागवडीचा संदेश घराघरात पोहचविला आहे. शासनाच्या हाकेला समता नगरातील महिलांनी साद दिली. येथील महिलांनी एकत्र येवून त्यांच्या वसाहतीतील एकमेव बालोद्यानातील कचरा काढून स्वच्छता अभियान राबविले आहे. सोमवारपासून येथील सुमारे ५० च्या वसाहतवासीय बालोद्यानातील कचरा काढण्यासाठी श्रमदान करीत आहेत. यात महिलांचा मोठा सहभाग आहे. पहिल्या दिवशी त्यांनी पुरूषांच्या मदतीने झुडपे तोडली. तर आज दुसऱ्या दिवशीही दिवसभर येथे श्रमदान करण्यात आले. बालोद्यानाचा पूर्णपणे कायापालट करून येथे ५० च्यावर विविध प्रजातींचे वृक्षारोपन करण्याचा संकल्प या महिलांनी घेतला आहे. महिलांच्या पुढाकारामुळे बालोद्यान कात टाकणार आहे. येथील बंद झालेला बालकांचा किलबिलाट पुन्हा एकदा येत्या काही दिवसात ऐकायला मिळणार आहे. त्यामुळे महिलांनी घेतलेला पुढाकार खरोखरचं वाखान्याजोगा व आदर्शवत आहे. (शहर प्रतिनिधी)या महिला, पुरूषांनी घेतला पुढाकारमेघा नारायणपुरे, कलावती कुंभारे, मंगला तितिरमारे, लता मोथरकर, प्रतिभा चांदेकर, माला भोगे, मंगला जगताप, कविता तिघरे, बेला ठकरेले, कविता गायधने, ज्योती नागरिकर, मीनाक्षी बालपांडे, रिंकू ठोंबरे, पे्रमनाथ चांदेकर, अरूण सेलोकर, देवीदास भारद्वाज, मनोज बोरकर, वैशाली झाडे, निक्कू कुंभारे, अक्षय फडके आदींनी पुढाकार घेतला.