शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

वन्यप्राण्यांची गावांकडे धाव

By admin | Updated: March 28, 2015 00:35 IST

वनप्रदूषण, पाणी प्रदूषणाचे प्रमाण वाढल्यामुळे बरेच जंगली प्राणी जंगलातून निघून शेतशिवारात न थांबता थेट गावांमध्ये, मानववस्तीत आश्रय घेत असतानाचे चित्र सध्या गावागावात पाहायला मिळत आहे.

मासळ : वनप्रदूषण, पाणी प्रदूषणाचे प्रमाण वाढल्यामुळे बरेच जंगली प्राणी जंगलातून निघून शेतशिवारात न थांबता थेट गावांमध्ये, मानववस्तीत आश्रय घेत असतानाचे चित्र सध्या गावागावात पाहायला मिळत आहे. एरवी माकडे ही शेतशिवारात किंवा जंगलात दिसायची. परंतु ुउपरोक्त सर्व बाबींमुळे माकडांनी मनुष्याच्या वस्तीमध्ये आपले बस्तान मांडले आहे.जैतपूर येथील नरेंद्र कॉलनी, एरिगेशन कॉलनी तसेच कावळे राईस मिल परिसरात माकडांचा धुमाकुळ नित्याचीच बाब ठरलीअ ाहे. पुरुषवर्ग दिवसभर कामानिमित्त घराबाहेर जातात. त्यामुळे घरकाम करणाऱ्या महिलांना व लहान मुलांना याचा सर्वात जास्त त्रास होत आहे. नर वानर हे अतिशय उग्र असतात व महिला व मुलांवर हल्ला करण्याचे प्रयत्न करतात. त्यामुळे घरकाम करणाऱ्या महिलांमध्ये भितीचे वातावरण तयार झाले आहे. माकड हा एकच प्राणी असा आहे की तो रंगातील फरक ओळखू शकतो. लाल रंगावर माकड हे जास्त राग व्यक्त करतात. माकडांनी गावात बस्तान मांडल्यामुळे परसबागातील रोपटे, फुलझाडे, टीव्हीचे अँटीना, घरावरच्या कवेलू यांचे अतोनात नुकसान झालेले आहणे. एवढेच नाही तर पाणी पिण्यासाठी बाथरूममध्ये घुसून पाणी पितात. बाहेरील नळाचे पाईप सुद्धा तोडण्याचा प्रताप सुद्धा माकडांनी केलेला आहे. तसेच जीवनोपयोगी वस्तू, दाळ, धान्ये व इतर किरकोळ वस्तू उन्हात बाहेर वाळवायला घालणे सुद्धा गृहिणींना कठीण होत आहे.अशाप्रकारे माकडांच्या माकडचेष्टांवर आवर घालण्याची वेळ आलेली आहे. तेव्हा या परिसरातील माकडांचा बंदोबस्त वनाधिकाऱ्यांनी करावा असे मत विजय ब्राम्हणकर, योगेश ब्राम्हणकर, विनोद पिल्लारे, चंदा झलके, सुनिल चौधरी यांनी व्यक्त केले आहे. तसेच जंगलामध्ये पाणवठ्याची संख्या वाढवून वृक्षाचे संवर्धन केल्यास माकडांचे मानववस्तीत होणारे स्थलांतर थांबविता येईल असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. (वार्ताहर)