ढगाळ वातावरणाने रबी पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 06:00 AM2020-01-20T06:00:00+5:302020-01-20T06:00:30+5:30

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार शनिवारपासून ढगाळ वातावरण होते. रविवारी भंडारात तुरळक पावसाच्या सरी बरसल्या. तूर पिकांसह हरभरा, चणा व अन्य कठाण पिकांना याचा फटका बसला. ढगाळ वातावरण हे अळी निर्माणीसाठी पोषक ठरत असते. फुलोºयानंतर बिजाईच्या उत्पादनात अळीचे निर्माण होत असल्याने त्याचा फटका उत्पादन क्षमतेवर होत असतो.

Ruby crops hit with cloudy weather | ढगाळ वातावरणाने रबी पिकांना फटका

ढगाळ वातावरणाने रबी पिकांना फटका

Next
ठळक मुद्देटेंशन वाढले : भाजीपाला पिकांवरही सक्रांत

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : महिनाभराच्या कालावधीत अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. पाच दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने उन्हाळी धानासह अन्य रबी पिकांना फटका बसला आहे. विशेष म्हणजे भाजीपाला पिकांवरही संक्रांत आली आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार शनिवारपासून ढगाळ वातावरण होते. रविवारी भंडारात तुरळक पावसाच्या सरी बरसल्या. तूर पिकांसह हरभरा, चणा व अन्य कठाण पिकांना याचा फटका बसला. ढगाळ वातावरण हे अळी निर्माणीसाठी पोषक ठरत असते. फुलोºयानंतर बिजाईच्या उत्पादनात अळीचे निर्माण होत असल्याने त्याचा फटका उत्पादन क्षमतेवर होत असतो. याचा सर्वाधिक प्रादूर्भाव तूर पिकावर दिसून आला. आठ दिवसांपूर्वी बरसलेल्या अवकाळी पावसामुळे होत्याचे नव्हते झाले होते. त्यानंतर पुन्हा उन्ह तापल्याने मिळेल त्या मार्गाने शेतकऱ्यांनी ओला झालेला धान वाळवायला सुरुवात केली होती. मात्र मंगळवारपासून बारदाना संपल्यामुळे धान खरेदी ठप्प झाली. त्यातच वाळलेला धानही पावसामुळे ओला झाल्यामुळे बळीराजा दुहेरी संकटात सापडला.
पाखर झालेला धान केंद्रात घ्यायला तयार नसल्याने दाद कुणाकडे मागायची अशी स्थिती बळीराजापुढे निर्माण झाली. यापूर्वी धानाचे हमीभाव वाळल्यानंतरही जुन्याच दराने धानाची खरेदी सुरु होती. मात्र या संदर्भात आवाज उठविल्यानंतर नवीन दराने धानाची विक्री होऊ लागली. मात्र बारदानाच नसल्याने ती खरेदीही ठप्प झाली. दरम्यान पुन्हा एकदा ढगाळ वातावरणाने बळीराजाचे टेंशन वाढविले असून भाजीपाला पिकांचेही नुकसान झाल्याचेही प्राथमिक माहिती आहे.

Web Title: Ruby crops hit with cloudy weather

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.