विद्यार्थ्यांच्या यशात पालकांची भूमिका महत्त्वाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:31 IST2021-04-03T04:31:48+5:302021-04-03T04:31:48+5:30

नगराध्यक्ष प्रदीप पडोळे : नेहरू विद्यालयात विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण तुमसर: कोणत्याही विद्यार्थ्याच्या यशामागे शिक्षणाची प्रेरणा व परिश्रम लाखमोलाचे ...

The role of parents is important in the success of students | विद्यार्थ्यांच्या यशात पालकांची भूमिका महत्त्वाची

विद्यार्थ्यांच्या यशात पालकांची भूमिका महत्त्वाची

नगराध्यक्ष प्रदीप पडोळे : नेहरू विद्यालयात विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण

तुमसर: कोणत्याही विद्यार्थ्याच्या यशामागे शिक्षणाची प्रेरणा व परिश्रम लाखमोलाचे असते. तसेच त्या यशात पालकांची भूमिकासुध्दा तेवढीच महत्त्वाची ठरते. शिक्षकांनी दिलेले ज्ञानाचे धडे आणि आई-वडिलांनी घडविलेले संस्कार त्या विद्यार्थ्याला खऱ्या अर्थाने यशाच्या शिखरावर नेऊन ठेवतात. म्हणून पालकांनी आपल्या पाल्याकडे सुरूवातीपासूनच लक्ष केंद्रित करून त्याला योग्य दिशा देण्याचे काम करावे असे प्रतिपादन तुमसर नगर परिषदेचे नगराध्यक्ष इंजि प्रदीप पडोळे यांनी केले.

ते नगर परिषद नेहरू विद्यालय येथे युवा व इको क्लब च्या माध्यमातून क्रीड़ा स्पर्धा,पुस्तक वाचन स्पर्धा,वादविवाद स्पर्धा,डांस स्पर्धा, अश्या विविध विषयावर स्पर्धा परीक्षा घेण्यात आले

होते त्या स्पर्धा चे पारितोषिक वितरण सोहळा प्रसंगी बोलत होते यावेळी घेण्यात आले यावेळी नप उपाध्यक्ष गिता कोंडेवार,शिक्षण सभापति अर्चना भूरे, नगरसेविका तारा गभने, मुख्याध्यापक थोटे प्रामुख्याने उपस्थित होते याप्रसंगी विविध स्पर्धेत प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व पारितोषिके देवून विजेत्यांचे गौरव करून उपस्थितांतर्फे विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे संचालन व आभार सिंगनजुडे यांनी मानले यावेळी न प नेहरू विद्यालय चे शिक्षक, शिक्षिका, व विद्यार्थिवर्ग प्रामुख्याने उपस्थित होते.

Web Title: The role of parents is important in the success of students