शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
5
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
6
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
7
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
8
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
9
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
10
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
11
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
13
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
14
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
15
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
16
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
17
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
18
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
19
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
20
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
Daily Top 2Weekly Top 5

यशवंत ग्राम समृद्धी योजनेचे रस्ते खड्डेमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2016 00:28 IST

सिहोरा परिसरातील ग्रामीण भागात यशवंत ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत बांधकाम करण्यात आलेली सिमेंट रस्ते खड्डेमय झाली आहेत.

आठ गावांतील गावकरी त्रस्त : निधीअभावी रस्त्याची दुरुस्ती अडलीरंजित चिंचखेडे  चुल्हाड (सिहोरा)सिहोरा परिसरातील ग्रामीण भागात यशवंत ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत बांधकाम करण्यात आलेली सिमेंट रस्ते खड्डेमय झाली आहेत. या सिमेंट रस्त्यावरून ये-जा करताना गावकऱ्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. निधीअभावी या रस्त्याची दुरुस्ती अडल्याची माहिती सरपंच यांनी दिली आहे. ग्रामीण भागात १० ते १२ वर्षापूर्वी यशवंत ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत सिमेंट रस्ते बांधकामाचे जाळे विणण्यात आली आहे. या य ोजनेने सिमेंट रस्ते बांधकामाचे स्वप्न प्रथमच गावकऱ्यांना दाखविले आहे. ८५ टक्के शासन व १५ टक्के लोकवर्गणी असे या योजनेचे स्वरुप होते. या महत्वाकांक्षी योजनेमुळे गावातील रस्ते चकाचक झाली आहेत. परंतु आता या रस्त्याची दूरवस्था झाली आहे. सिमेंट रस्त्यावर ३ ते ४ फुट लांब अंतरचे खड्डे पडली आहेत. यामुळे गावकऱ्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. जीर्ण रस्ते दुरुस्त्या करिता शासनस्तरावर अद्यापपर्यंत स्वतंत्र पॅकेज ग्रामपंचायतींना देण्यात आलेला नाही. शासनाने १४ व्या वित्त आयोग अंतर्गत निधी दिला आहे. परंतु या अनुदान देयकांचे शासनस्तरावर नियोजन ठरले आहे. गावे विकास व ठराविक नियोजनात प्राप्त निधी खर्च करता येत नसल्याने ग्राम पंचायतीची पंचायत सुरु झाली आहे. सामान्य फंडात जमा होणारा निधी नाही. गावकऱ्यांकडे वाढती थकबाकी व कर्मचाऱ्यांचे वेतनाचे नियोजन याच फंड अंतर्गत होत असल्याने गावात विकास कामाचा बोजवारा वाजला आहे. यशवंत ग्राम समृद्धी तथा दलीत वस्ती सुधार योजनेअंतर्गत बांधकाम करण्यात आलेली जुने सिमेंट रस्ते जीर्ण झाली आहेत. या रस्त्याची लोखंडी रॉड बाहेर पडल्याने अपघातात वाढ झाली आहे. सिमेंट रस्त्याचे खड्ड्यात मुरमाचा लॉलीपॉप देण्याचा प्रयत्न ग्राम पंचायतीनी केला आहे. परंतु हा प्रयोग पावसाळा ओसरताच फसला आहे. पुन्हा गावात सिमेंट रस्त्यावरील खड्याची स्थिती जैसे थे झाली आहे. गावात आयोजित ग्रामसभेत जीर्ण सिमेंट रस्त्याचे खड्डे गाजले आहे. या रस्त्यांचा फटका सर्वाधिक शाळकरी विद्यार्थ्यांना बसला आहे. रस्ते नव्याने दुरुस्तीकरिता निधी नसल्याची ओरड सरपंचानी सुरु केली आहे. गावात नवीन विकास कामांना मंजूरी देण्यात येत असली तरी जुने आणि जीर्ण रस्ते दुरुस्ती करण्याची मागणी गावकरी करीत आहेत.