शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

तहसीलकडे जाणारा रस्ता खड्ड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 05:01 IST

गत कित्येक दिवसांपासून या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्यांतून वाहन चालविणे त्रासदायक ठरत असून तहसील कार्यालयात पालकमंत्री विश्वजीत कदम, जिल्हाधिकारी कदम यांनी सर्व विभागाची आढावा बैठक घेतली. तेव्हा त्यांना याच खड्यातून प्रवास करावा लागला. मात्र या खड्डेमय रस्त्याविषयी कुणीही तक्रार केली नाही किंवा चर्चा केली नाही हे विशेष.

ठळक मुद्देसाकोली येथील प्रकार : तीन वर्षातच उखडला रस्ता, बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : तालुक्याचा कारभार चालणाऱ्या साकोली तहसील कार्यालयाकडे जाणारा रस्ता खड्ड्यात हरवल्याने नागरिकांना संघर्ष करावा लागत आहे. हा रस्ता तीन वर्षापूर्वीच तयार करण्यात आला होता. मात्र निकृष्ठ दर्जाचे साहित्य वापरल्याने रस्ता अल्पावधीतच उखडला आहे. या रस्तेकामाची चौकशी करुन कंत्राटदारावर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.गत कित्येक दिवसांपासून या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्यांतून वाहन चालविणे त्रासदायक ठरत असून तहसील कार्यालयात पालकमंत्री विश्वजीत कदम, जिल्हाधिकारी कदम यांनी सर्व विभागाची आढावा बैठक घेतली. तेव्हा त्यांना याच खड्यातून प्रवास करावा लागला. मात्र या खड्डेमय रस्त्याविषयी कुणीही तक्रार केली नाही किंवा चर्चा केली नाही हे विशेष.या बैठकीचा संबंधीत विभागाचे अभियंता सुध्दा उपस्थित होते. तरीही रस्त्याकडे दुर्लक्ष का? सदर रस्ता हा तहसील कार्यालयाव्यतिरिक्त गडकुंभली गावालाही जात असल्याने वर्दळ असते. रस्त्यावर टुरीझमचे गेस्ट हाऊस असल्याने देशी-विदेशी पर्यटकांचे जाणे येणेही सुरु असते. तालुक्यातील नागरिकांच्या महत्वपूर्ण कार्यालयाचाच रस्ता खड्यात गेल्याने अनेकांनी याची तक्रार केली आहे. या रस्त्याची तात्काळ दुरस्तीकरावी अशी मागणी होत आहे.या रस्त्याची चौकशी करासदर रस्त्याची दुरुस्ती व डांबरीकणाचे काम मागील तीन चार वर्षापूर्वीच करण्यात आले. मात्र कंत्राटदाराने निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याने काम दर्जाहीन झाले. परिणामी रस्त्यात ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. कंत्राटदारासह शाखा अभियंत्यानीही आर्थिक देवाण घेवाण करुन सदर रस्त्याची देयके मंजूर केली. या प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्यात यावी. सखोली चौकशीनंतर खरे सत्य बाहेर येईल. वर्षानुवर्षे शासन रस्ते कामासाठी लाखो रुपये खर्च करते तर दुसरीकडे आर्थिक हितसंबंध जोपासण्यासाठी संबंधित विभागाचे अधिकारी, कंत्राटदार रस्त्याच्या दर्जाकडे लक्ष देत नाहीत असा आरोप नागरिकांतून होत आहे.

टॅग्स :Rainपाऊसroad transportरस्ते वाहतूक