शहरं
Join us  
Trending Stories
1
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
2
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
3
डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे निधन; ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
सेन्सेक्स लवकरच ८९ हजारांवर? ‘मॉर्गन स्टॅन्ले’चा अहवाल; १५ टक्के वाढीचा अंदाज
5
Sunil Bharti Mittal: अदानी-अंबानींच्या मार्गावर सुनील मित्तल; १० वर्षांत सोडणार Airtel ची खुर्ची, कोण असेल उत्तराधिकारी?
6
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
7
नॉर्मल पेट्रोल आणि प्रीमियम पेट्रोल म्हणजे काय? दोन्हीच्या किमतीत किती फरक असतो? जाणून घ्या...
8
अग्रलेख : अजितदादा, हे पाहताय ना?
9
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
10
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
11
विशेष लेख: महाराष्ट्रातही लाखो मतदार वगळले जातील का?
12
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
13
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
14
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
15
‘प्रतिस्पर्धी नको, आपण भागीदार बनू; व्यापार युद्धात कोणीच विजयी नसतो’, शी जिनपिंग यांच्या ट्रम्प यांना कानपिचक्या
16
भारतीय रोज किती सोने खरेदी करतात? सरासरी दोन टन!
17
जावेद जाफ़रीच्या पत्नीची १७.५ कोटींची फसवणूक: वादग्रस्त महापालिका सहायक आयुक्त पाटीलसह साथीदारांविरुद्ध गुन्हा; पटेलला अटक
18
महाराष्ट्रात काटकसर सुरू! अधिकारी आठवड्यातून किमान १ दिवस फिरणार रेल्वे, बसने
19
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
20
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
Daily Top 2Weekly Top 5

वादळाच्या तडाख्यात राईस मिलची भिंत कोसळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 05:00 IST

तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या खराडी येथे गुरूवारी सायंकाळी रात्री वादळी वाऱ्यासह पावसाचा तडखा बसला. त्यात अनेक घरांवरील टिनपत्रे उडली तर वृक्ष उन्मळून पडली. याच वादळात साईबाबा राईस मीलचे पत्रे उडून अचानक भींत कोसळली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र यामध्ये मिलमध्ये ठेवलेले ३० ते ४० धान पोते भीजले. शुक्रवारी महसूल विभागाच्या पथकाने भेट दिली.

ठळक मुद्देखराडी येथील घटना। महसूल विभागाने केली पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : अवकाळी पाऊस आणि वादळाच्या तडाख्यात भंडारा तालुक्यातील खराडी येथील साईबाबा राईस मिलचे टिनपत्रे तसेच ३० फूट लांबीची भिंत कोसळल्याची घटना गुरूवारी घडली. यात सुमारे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले.
तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या खराडी येथे गुरूवारी सायंकाळी रात्री वादळी वाऱ्यासह पावसाचा तडखा बसला. त्यात अनेक घरांवरील टिनपत्रे उडली तर वृक्ष उन्मळून पडली. याच वादळात साईबाबा राईस मीलचे पत्रे उडून अचानक भींत कोसळली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र यामध्ये मिलमध्ये ठेवलेले ३० ते ४० धान पोते भीजले. शुक्रवारी महसूल विभागाच्या पथकाने भेट दिली. यावेळी खरबीचे तलाठी इप्पर, सरपंच रत्नमाला वाडीभस्मे, उपसरपंच संजय आकरे, सुरेश गिरीपुंजे, रंजीत गिरीपुंजे, विक्की गिरीपुंजे यांनी पाहणी केली. यावेळी साईबाबा राईस मिलचे मालक सुनील गिरीपुंजे यांनी महसूल विभागाकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे.
गावात झालेल्या या वादळी पावसाने काही काळ हाहाकार उडाला होता. अचानक आलेल्या वादळाने अनेकांची त्रेधा उडाली. दुसºया दिवशी प्रत्येकजण आपले घर सावरतांना दिसत होते. शेती पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. या सर्वांना नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे.
अवकाळी पाऊस गत काही दिवसांपासून सारखा कोसळत आहे. गत आठ दिवसांपासून तर गारांचा वर्षावही होत आहे. वादळी वातावरणाने शेतकरी हवालदिल झाले आहे. अनेकांचे शेती पिकांचे नुकसान झाले आहे.