शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

रेती घाट लिलावातून ५४ कोटींचा महसूल

By admin | Updated: May 18, 2017 00:31 IST

गौण खनिजांच्या बाबतीत परिपूर्णता लाभलेल्या पूर्व विदर्भातील भंडारा जिल्हा प्रशासनाला रेती घाटांचे लिलाव, ...

जिल्ह्यात ५३ रेतीघाट : केवळ २७ रेतीघाटांचे लिलावइंद्रपाल कटकवार । लोकमत न्यूज नेटवर्कगौण खनिजांच्या बाबतीत परिपूर्णता लाभलेल्या पूर्व विदर्भातील भंडारा जिल्हा प्रशासनाला रेती घाटांचे लिलाव, दंड व अन्य वसुलीतून ५४ कोटी ११ लाखांचा महसुल मिळाला आहे. दुसरीकडे मात्र रेती तस्करीच्या घटना खुलेआम सुरू असल्याने यावर आळा बसविणे जिकरीचे ठरत आहे.जिल्ह्यातील जीवनदायीनी वैनगंगा नदीसह तिच्या उपनद्यांमध्ये रेतीचा वारेमाप साठा आहे. याच संधीचे सोने रेती तस्कर करीत आहेत. सकाळ, दुपार, संध्याकाळ असो की मध्यरात्र, रेतीची तस्करी बंद आहे, असे दिसून येत नाही. यावर कित्येक ठिकाणी महसूल प्रशासनाने कारवाई केली असली तरी रेती तस्करांच्या मुसक्या आवयण्यात जिल्हा प्रशासनाला यश लाभलेले नाही. गत वर्षभरात जिल्हा खनिकर्म विभागामार्फत जिल्हाभरातील ५३ रेतीघाटांपैकी २७ रेती घाटांचा लिाव करण्यात आला. यातून २७ कोटी ९५ लक्ष रूपयांचा महसूल मिळाला. पाच वर्षांसाठी दीर्घ खनिपट्टा अंतर्गत प्रशासनाला ५ कोटी ९९ लक्ष रूपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. रेतीचे अवैध खनन केल्याप्रकरणी केलेल्या कारवाईतून ३ कोटी ४६ लक्ष १८ हजार रूपयांची वसुली करण्यात आली. तद्वतच इतर विभागाकडून गौण खनिजांचे वापर केल्याने त्याकडून १४ कोटी पाच लक्ष तर तात्पुरता परवाना देण्यापोटी शासनाला २ कोटी ६३ लाखांचा निधी मिळाला आहे. यासर्व कारवाईतून जिल्हा प्रशासनाला ५४ कोटी ११ लक्ष २५ हजर रूपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. नियमाप्रमाणे जिल्ह्यातील रेतीघाटांचे लिलाव करण्यात आले आहे. यातूनच शासनाला महसुल प्राप्त झाला आहे. रेती तस्करांवर अंकुश लावण्यासाठी स्थानिक नागरिकांचे सहकार्य असणे अत्यंत गरजेचे आहे.- सुरेश नैतामजिल्हा खनिकर्म अधिकारी, भंडारा.