शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूला परतवून ‘ती’ जगली २० वर्षे

By admin | Updated: May 9, 2017 00:22 IST

मृत्यू हा एवढा शब्द कानी पडला तरी प्रत्येकांचा थरकाप उडतो. मृत्यू म्हणजे नेमके काय या प्रश्नाचे उत्तर शोधता शोधता कित्येक जन्म खर्ची पडतात.

अखेर श्वास संपला : नातू-पणतूंचा गोतावळा अनुभवलाराजू बांते । लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : मृत्यू हा एवढा शब्द कानी पडला तरी प्रत्येकांचा थरकाप उडतो. मृत्यू म्हणजे नेमके काय या प्रश्नाचे उत्तर शोधता शोधता कित्येक जन्म खर्ची पडतात. परंतु एका वृद्धेने २० वर्षांपूर्वी मृत्यूला आलिंगन दिले. त्यातून ती परतही आली अन् तब्बल वीस वर्ष मृत्यूवर विजय मिळवून तिने आज सोमवारला अखेरचा श्वास घेतला. भागरथा ईश्वरकर, असे त्या वृद्धेचे नाव आहे.मोहाडी तालुक्यातील रोहणा येथील किसन ईश्वरकर यांनी भागरथा यांच्याशी लग्न केले. पहिल्या पत्नीला तीन अपत्ये झाली. त्यानंतर भागरथाबाईचा मृत्यू झाला. पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर त्यांनी दुसरे लग्न केले. पहिल्या पत्नीवर प्रेम असल्यामुळे त्यांनी दुसऱ्या पत्नीचेही नाव भागरथाच ठेवले. दोघांच्याही आयुष्यवाटा एकाच दिशेने सुखी समाधानाने निघत होत्या. किसन ईश्वरकर यांना दुसऱ्या पत्नीपासून तीन मुले व चार मुली झाल्या. २५ वर्षापुर्वी किसन ईश्वरकर यांचे निधन झाले. त्यानंतर मुला-मुलींच्या मायेच्या सावलीने जगणारी भागरथा पांजरा (बोथली) येथील यशोदा नामक मुलीकडे भेटीला गेली. तिथेच भागरथाबाईची प्रकृती बिघडली. त्यानंतर तिला वरठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगून आता तिचे जगणे शक्य नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. काही वेळानंतर डॉक्टरांनी भागिरथाला मृत घोषीत केले. मृत्यू झाला म्हणून भागरथाला रोहणा येथे स्वगावी नेण्यात आले. सगळ्या नातेवाईकांना मृत्यूची बातमी देण्यात आली. अंत्यविधीचा निरोपही देण्यात आला. सगळी मंडळी रोहणा येथे पोहोचली. अग्निसंस्काराचा सोपस्कार सुरु होता. अन् आश्चर्य बघा भागरथाने दीर्घ श्वास घेतला आणि एकच धावपळ उडाली. बाई जीवंत आहे, असा कल्लोळ सुरु झाला. खरच भागरथा उठून बसली, हा सगळा प्रकार बघून तिलाही नवलच वाटले. भागरथाबाईने ‘याची देही याची डोळा’ मृत्यूचा सोहळा अनुभवला. तो प्रसंग दु:खाचा होता. अंत्यसंस्कारासाठी आलेल्या आप्तेष्ठांनी दुखाची घटना सुखाच्या सोहळ्यात त्यावेळी अनुभवली होती. त्यानंतर २० वर्ष भागरथाबाई अगदी ठणठणीत जगली. काल परवा तिला ताप आला. पण, ती चालत बोलत होती. रविवाला सायंकाळी ४ वाजता तिने चालताबोलता अखेरचा श्वास घेतला. सोमवारला सकाळी रोहणा येथील सूर नदीवर तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ‘जन्मातही नव्हते कधी मी, तोंड माझे लपविले. मेल्यावरी संपूर्ण त्यांनी, वस्त्रात मजला झाकले.’