शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

बाजारसमितीत नियमबाह्य पदभरती

By admin | Updated: May 9, 2017 00:26 IST

कृषी उत्पन्न बाजार समिती लाखनी येथे सन २०१२-१३ मध्ये नियमबाह्य पदभरती करण्यात आली आहे.

कारवाईस जिल्हा उपनिबंधकांची टाळाटाळ : पत्रपरिषदेत दीपराज इलमकार यांचा आरोपलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कृषी उत्पन्न बाजार समिती लाखनी येथे सन २०१२-१३ मध्ये नियमबाह्य पदभरती करण्यात आली आहे. याची तक्रार जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांचेकडे देऊनही अद्यापपर्यंत कोणतीच कार्यवाही करण्यात आली नाही, असा आरोप विश्रामगृहात आयोजित पत्रपरिषदेत डॉ. दिपराज इलमकार यांनी केला.डॉ. इलमकार म्हणाले, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, भंडारा यांच्या अटी व शर्तीनुसार सन २०१२ -१३ मध्ये एकूण ८ जागा भरणे आवश्यक होते. समितीने जिल्हा सेवा योजना कार्यालय भंडारा, समाज कल्याण कार्यालय भंडारा, आदिवासी विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे ६ डिसेंबर २०११ ला पत्र पाठवून कर्मचारी भरती करण्यासाठी वय १८ ते ३० वयोगटाचे निरीक्षक व कनिष्ठ लिपीक या उमेदवारांची यादी सादर करण्यासाठभ पत्र पाठविले. परंतु पेपरमध्ये जाहिरात देताना खुल्या प्रवर्गासाठी वयमर्यादा १८ ते ३३ मागासवर्गीय प्रवर्गाकरीता वयमर्यादा १८ ते ३८ राहिले असे प्रसिद्ध करून शासनाची दिशाभूल केली. बाजार समिती कर्मचारी सेवा भरती नियम ९ अ प्रमाणे ही वयमर्यादा १८ ते ३० व मागासवर्गीय प्रवर्गाकरीता वय मर्यादा १८ ते ३० राहिल असे स्पष्ट नमुद आहे. बाजार समिती कर्मचारी सेवा भरती नियम ९ ब प्रमाणे वर विहित केलेली वयमर्यादा पाच वर्षापर्यंत शिथिल करता येते.बाजार समितीच्या संचालक मंडळांनी २८ नोव्हंबर २०११ ला ठराव घेवून बाजार समिती लाखनीचे सेवेत असलेल्या अस्थाई, हंगामी कर्मचारी यांना पदवी, संगणक व टायपिंग लागू राहणार नाही, असा ठराव घेवून मंजूर करण्यात आला. त्या ठरावामध्ये वयाच्या अटीबाबत ठराव घेण्यात आला नाही. तो ठराव पणन संचालकाकडून मान्यता प्राप्त करून घेणे गरजेचे असताना सुद्धा त्या ठरावाची मान्यता घेण्यात आली नाही व पदे भरण्यात आली. निकषाप्रमाणे सहसचिव स्वप्नील गायधने, लेखापाल लोकेश मोटघरे, लिपीक धनंजय बावनकुळे, किशोर भैसारे, विलास मांडवटकर यांची भरती नियमबाह्य झालेली असताना जिल्हा उपनिबंधक भंडारा यांनी ९ ते २०१२ रोजी यास मंजुरी दिली. समितीचे संचालक केशव मांडवटकर हे भरती निवड समितीमध्ये सभासद असताना सुद्धा स्वत:च्या मुलाला विलास मांवटकर यांना नियुक्ती केली, असाही आरोप डॉ. इलमकार यांनी केला आहे. धनंजय बावनकुळे, किशोर भैसारे, विलास मांडवटकर हे हंगामात रोजंदारीवर काम करीत असल्यामुळे नियमानुसार तीन वर्ष अखंड सेवा केली असा अर्थ अभिप्रेत होत नाही. ते पदवीधर नसून वयातही बसत नव्हते. त्यांच्याकडे मराठी टायपिंग नाही. लोकेश मोटघरे हे निर्धारित वयापेक्षा मोठे होते. त्यांच्याकडे अनुभव नव्हता, असे असतानाही त्यांची भरती करण्यात आली.पाच जागा या नियमांची पायमल्ली करून गैरमार्गाने भरल्या आहेत. याची तक्रार जिल्हा उपनिबंधक भंडारा, पणन संचालक पुणे, मुख्य सचिव व मंत्री सहकार व पणन यांच्याकडे ३० नोव्हेंबर २०१६ ला रितसर करण्यात आली. मात्र त्यावर अद्यापपर्यंत कोणतीच कार्यवाही करण्यात आली नाही, असाही आरोप त्यांनी केला आहे. यावेळी विनोद चकोले, शैलेश जांभुळकर उपस्थित होते.कृषी उत्पन्न बाजार समिती लाखनीची पदभरती चार वर्षांपुर्वी करण्यात आली होती. डीडीआरच्या नियम व निकषानुसार परीक्षेद्वारे पदभरती करण्यात आली आहे. डीडीआरच्या नेतृत्वात पदभरतीची प्रक्रिया पार पडली असून दीपराज इलमकार वारंवार खोटे आरोप करीत आहेत तसेच प्रशासनाकडे तक्रार करीत असतात. इलमकार यांच्यावर राईसमिलचे शेष शिल्लक आहे. बाजार समितीद्वारे नोटीस पाठविण्यात आले आहे. इलमकार गेल्या पाच वर्षांपासून बाजार समितीच्या विरूद्ध तक्रारी करीत असतात. त्याची चौकशी प्रशासनाकडून होत असते. इलमकार हे "ब्लॅकमेलिंग" करण्याचा प्रयत्न करीत आहेत. प्रसिद्धी माध्यमाद्वारे बाजार समितीची बदनामी करीत आहेत. -शिवराम गिऱ्हेपुंजे, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, लाखनी.