शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

भंडारात विक्रमी 78 व्यक्तींचे प्लाझ्मा दान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 05:00 IST

जिल्ह्यात काेराेना रुग्णांच्या संख्येत घट हाेत असली तरी गंभीर परिस्थितीत अनेक रुग्ण आहेत. अशा रुग्णांना इतर औषधीसाेबतच प्लाझ्मा उपयुक्त ठरत आहे. प्लाझ्मा दिलेल्या रुग्णांमध्ये उपचाराला प्रतिसाद देण्याची क्षमता वाढत आहे. त्यासाठीच काेराेनामुक्त झालेल्या व्यक्तींचा प्लाझ्मा काेराेनाबाधितांना दिला जात आहे. मात्र भंडारासारख्या शहरात प्लाझ्मा मिळणे जिकरीचे काम हाेते. रुग्णांच्या नातेवाईकांना नागपूरशी संपर्क साधून प्लाझ्मा मिळवावा लागत हाेता.

ठळक मुद्देराज्यातील सर्वात माेठे शिबीर : जिल्हाधिकाऱ्यांचे रक्तदान, अपर जिल्हाधिकाऱ्यांनी केले प्लाझ्मा दान

  लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : काेराेना संसर्गात गंभीर रुग्णाला आवश्यक प्लाझ्मा उपलब्ध व्हावा यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने  आयाेजित शिबिरात तब्बल ७८ व्यक्तींनी आपला प्लाझ्मा दान केला. राज्यातील आतापर्यंतचे सर्वात माेठे शिबिर म्हणून याची नाेंद झाली आहे. या शिबिरात जिल्हाधिकाऱ्यांनी रक्तदान तर अपर जिल्हाधिकाऱ्यांसह अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्लाझ्मा दान केले. संकलीत झालेला प्लाझ्मा गरजू रुग्णांना माेफत दिला जाणार आहे.
जिल्ह्यात काेराेना रुग्णांच्या संख्येत घट हाेत असली तरी गंभीर परिस्थितीत अनेक रुग्ण आहेत. अशा रुग्णांना इतर औषधीसाेबतच प्लाझ्मा उपयुक्त ठरत आहे. प्लाझ्मा दिलेल्या रुग्णांमध्ये उपचाराला प्रतिसाद देण्याची क्षमता वाढत आहे. त्यासाठीच काेराेनामुक्त झालेल्या व्यक्तींचा प्लाझ्मा काेराेनाबाधितांना दिला जात आहे. मात्र भंडारासारख्या शहरात प्लाझ्मा मिळणे जिकरीचे काम हाेते. रुग्णांच्या नातेवाईकांना नागपूरशी संपर्क साधून प्लाझ्मा मिळवावा लागत हाेता. जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी परिस्थितीचे गांभिर्य ओळखून शिबिर आयाेजित केले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात तीन दिवसीय शिबिरात १४७ अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी नाेंदणी केली. आरबीडी व ॲन्टीबाॅडी तपासणीनंतर शिबिर घेण्यात आले. या शिबिरात ६० व्यक्तींचा प्लाझ्मा स्विकारण्यात आला असून १८ जण प्लाझ्मासाठी पात्र ठरले आहे. त्यांचा प्लाझ्मा शनिवारी घेण्यात येणार आहे. 
जिल्हा प्रशासनाच्या या उपक्रमाची आमदार नरेंद्र भाेंडेकर यांनी प्रशंसा केली. काेराेना हाेवून गेलेल्या व्यक्तींनी प्लाझ्मा दान करावे, असे आवाहन केले. शिबिराच्या पहिल्या दिवशी ११६, दुसऱ्या दिवशी सहा आणि तिसऱ्या दिवशी २५ लाेकांनी तपासणीसाठी नाेंदणी केली. यात पात्र ठरलेल्या व्यक्तींनी प्लाझ्मा दान केला. विशेष म्हणजे या शिबिरात जिल्हाधिकारी संदीप कदम तर अपर जिल्हाधिकारी घनश्याम भुगावकर यांनी प्लाझ्मा दान केला. जिल्हाधिकारी यांनी पुढाकार घेतल्याने यात सर्वांन उत्स्फूर्त सहभाग नाेंदविला. संपूर्ण राज्यात सर्वात माेठे प्लाझ्मा दान शिबिर असल्याचे लाईफलाईन ब्लड बॅंकेचे डाॅ. हरिश वर्धे यांनी सांगितले. प्लाझ्माच्या माध्यमातून भंडाराने विक्रम नाेंदविला.

गरजू रुग्णांना मिळणार माेफत प्लाझ्मा
 काेराेना रुग्णांसाठी संजिवनी ठरणारा प्लाझ्मा भंडारा येथे संकलीत करण्यात आला. अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आता हा प्लाझ्मा शासकीय रुग्णालयात गरजू रुग्णांना माेफत देण्यात येणार आहे. अशा प्रकारचे प्लाझ्मा दान शिबिर यापुढेही आयाेजित करण्याचा मानस असल्याचे जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी सांगितले. या शिबिरातून काेराेना बाधितांना दिलासा मिळेल. 

 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या