शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
2
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
3
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
4
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
5
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
6
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
7
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
8
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
9
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
10
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
11
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
12
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
13
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
14
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
15
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
16
नव्या आर्थिक वर्षात टाटा मोठा धमाका करणार! लवकरच ६ नव्या 'ढासू' कार बाजारात आणणार; बघा संपूर्ण प्लॅन
17
हॉटेलची रूम दिसते चकाचक, पण टॉयलेट सीटपेक्षा घाणेरड्या असतात 'या' गोष्टी; वापरताना सावधान
18
महिलांना दरमहा ३००० रुपये, मोफत बस प्रवास अन्...! सुवेंदू सरकार ॲक्शन मोडवर, १ जूनपासून खात्यात जमा होणार पैसे
19
"रस्त्यावर नमाज पठण चालणार नाही, प्रेमाने सांगून ऐकलं नाही तर..."; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा इशारा 
20
IPL 2026 सुरू असताना धोनी अचानक NSG कॅम्पमध्ये; कमांडोंसोबत केला नेमबाजीचा सराव (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून नुकसान भरपाई द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 06:00 IST

यावर्षी समाधानकारक पाऊस असल्याने धानाचे भरघोस उत्पादन येण्याची खात्री होती. काही भागात हलक्या प्रतीच्या धानाची कापणी झाली असून, कुठे कापणी सुरू आहे, तर पुढील काही दिवसात कापणीस योग्य होईल अशी स्थिती आहे. चांगले उत्पादन येण्याच्या आशेने शेतकरी आनंदात होते. परंतु, गत आठवड्यात संपूर्ण परिसराला परतीच्या पावसाने झोडपून काढले.

ठळक मुद्देनरेंद्र भोंडेकर : जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : गत आठवड्यात झालेल्या परतीच्या पावसाने भंडारा व पवनी या दोन्ही तालुक्यात हजारो हेक्टरमधील धान पिकाचे प्रचंड नुकसान झाले असून, तातडीने पंचनामे करुन भंडारा जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी भंडारा मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
यावर्षी समाधानकारक पाऊस असल्याने धानाचे भरघोस उत्पादन येण्याची खात्री होती. काही भागात हलक्या प्रतीच्या धानाची कापणी झाली असून, कुठे कापणी सुरू आहे, तर पुढील काही दिवसात कापणीस योग्य होईल अशी स्थिती आहे. चांगले उत्पादन येण्याच्या आशेने शेतकरी आनंदात होते. परंतु, गत आठवड्यात संपूर्ण परिसराला परतीच्या पावसाने झोडपून काढले. यामुळे शेतात उभा कापणी योग्य धान भूईसपाट झाला असून, शेतात पाणी साचल्याने कापणी झालेला धान सडत आहे. यामुळे शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले असून, दिवाळीच्या आनंदावर विरजण पडले आहे. दरम्यान, आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी नुकसानीची पाहणी केली.
नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना धीर देत सर्वतोपरी मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. अवकाळी पावसामुळे नुकसानीचे कृषी व महसूल विभागाने तातडीने पंचनामे करावे, नुकसानीचा अहवाल शासनाकडे सादर करावा, शेतकºयांना नुकसान भरपाई म्हणून प्रति हेक्टर २५ हजार रुपये आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी निवेदनातून केली आहे. शिष्टमंडळात शिवसेनेचे संजय रेहपाडे, अनिल गायधने, यशवंत वंजारी, राजेश सार्वे, नरेश झलके, राजू ब्राम्हणकर, सुधाकर साठवणे, नरेश बोपचे, क्रिष्णा ठोसरे, विजय कुंभरे, मयुर लांजेवार यांच्या सहभाग होता.